हडपसर
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे. |
हडपसर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहराचे उपनगर आहे. भाजीची विक्री आणि शेती हे येथील मुख्य व्यवसाय आहेत. हे उपनगर पुणे रेल्वे स्टेशनपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. हडपसरजवळ एक ग्लायडिंग सेन्टर आहे. तेथे वाऱ्यावर चालणारी बिनाइंजिनांची विमाने उडवता येतात. विमानात चालक आणि दोन प्रवासी बसू शकतात. सहा पदरी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ हडपसरवरून जातो.
येथे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, हनिवेल, भारत फोर्ज, गिट्स फूड प्रॉडक्ट्स, इंडियन ह्यूम पाइप फॅक्टरी, किर्लोस्कर व इतर अनेक उद्योग आहेत.
माहिती तंत्रज्ञान कार्यालये (आय टी पार्क) असलेले मगरपट्टा सिटी आणि भेकराईनगर यांमुळे ह्डपसरला खास महत्त्व प्राप्त झाले आहे.
महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म हडपसरला झाला होता [ संदर्भ हवा ].
हबीबगंज (भोपाळ) ते हडपसर यादरम्यान धावणारी एक खासगी मालकीची आगगाडी आहे.
हे सुद्धा पहा[संपादन]
- अण्णा साहेब मगर महाविद्यालय
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |