अशोक चव्हाण
अशोक शंकरराव चव्हाण | |
![]()
| |
कार्यकाळ डिसेंबर ८, इ.स. २००८ – नोव्हेंबर ११, इ.स. २०१० | |
राज्यपाल | के. शंकरनारायणन |
---|---|
मागील | विलासराव देशमुख |
पुढील | पृथ्वीराज चव्हाण |
मतदारसंघ | भोकर |
जन्म | २८ ऑक्टोबर, १९५८ मुंबई |
राजकीय पक्ष | कॉंग्रेस |
पत्नी | अमिता अशोक चव्हाण |
अपत्ये | २ मुली |
निवास | मुंबई |
संकेतस्थळ | संकेतस्थळ |
अशोक शंकरराव चव्हाण (ऑक्टोबर २८, इ.स. १९५८ - हयात) हे डिसेंबर ८, इ.स. २००८ ते नोव्हेंबर ११, इ.स. २०१० या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. २००८ साली मुंबई हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री बनले. ५ डिसेंबर इ.स. २००८ रोजी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने त्यांची निवड केल्यानंतर ८ डिसेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते सांस्कृतिक, उद्योग, खाण या खात्यांचेही मंत्री होते. चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत.
इ.स. २००९ सालातील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण आमदार म्हणून निवडून आले. तसेच त्यांना भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश समितीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे चव्हाण सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी कॉंग्रेस पक्षातर्फे विलासराव देशमुख यांची अशी सलग दोन वेळा निवड झाली होती. मात्र इ.स. २०१० साली आदर्श हाउसिंग सोसायटी या कारगिलमधील हुतात्म्यांच्या वारसदारांसाठी मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारतीत त्यांनी आपल्या नातेवाईकांना घरे देऊ केल्याबद्दल गदारोळ होऊन त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले.
१४/०३/२०१२ रोजी संरक्षणमंत्री ए.के. ॲंटनी यांनी लोकसभेत सांगितल्या प्रमाणे अशोक शंकरराव चव्हाण हे मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी एक आरोपीं आहेत.[१]
संदर्भ[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
सद्मा ते नांदेड लोकसभा मतदार संघातुन खासदार आहेत
व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत
बाह्य दुवे[संपादन]
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
मागील: विलासराव देशमुख |
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डिसेंबर ८, इ.स. २००८ – नोव्हेंबर ११, इ.स. २०१० |
पुढील: पृथ्वीराज चव्हाण |
- इ.स. १९५८ मधील जन्म
- विस्तार विनंती
- भारतीय राजकारणी
- महाराष्ट्रामधील राजकारणी
- भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षातील राजकारणी
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
- महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
- ८ वी लोकसभा सदस्य
- नांदेडचे खासदार
- भारतातील भ्रष्टाचाराचे आरोपी
- १६ वी लोकसभा सदस्य
- महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य