आषाढी एकादशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी. तिथीची वृद्धी झाली, किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात.


तिथीची वृद्धी[संपादन]

देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, भागवत एकादशी, अशा तिथी वृद्धी या चांद्रमास गणनेतील फरकामुळे होतात. अधिक मास आल्यास आधिक मासाच्या आणखी दोन एकादश्या येतात. अधिक महिन्यात येणार्‍या दोनही एकादश्यांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते.

देवशयनी एकादशी[संपादन]

हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. [१]महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो.

धार्मिक कथा[संपादन]

पौराणिक काळी मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही. फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल असा वर मिळतो. त्यामुळे उन्मत होऊन मृदुमान्य राक्षस देवांवर स्वारी करतो व त्याचा पराभव करतो. सर्व देव पराभूत होऊन एका गुहेत लपतात. त्याच वेळी एकादशी देवतेचा जन्म होतो व ती मृदुमान्य राक्षसाचा नाश करून देवांची मुक्तता करते. त्यावेळी पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचे स्नान होते व गुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्याचा प्रघात पडला. परस्परावर प्रेम करणे, प्राणिमात्र, अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो. मराठी हिंदूंच्या दृष्टीने हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे.

स्मार्तांची एकादशी[संपादन]

भागवत एकादशी[संपादन]

आषाढ वद्य एकादशी[संपादन]

आषाढ वद्य एकादशीला कामिका एकादशी म्हणतात.

चित्रदालन[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Upadhyaya, Baldeva (1978). Vaishṇava sampradāyoṃ kā sāhitya aura siddhānta: Bhāratavarsha ke pradhāna Vaishṇava sampradāyoṃ ke sāhitya tathā siddhānta kā sāṅgopāṅga vivecana (hi मजकूर). Caukhambā Amarabhāratī Prakāśana.