Jump to content

आघारकर संशोधन संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुण्यातील आघारकर संशोधन संस्था ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील अनुदानित स्वायत्त संस्था असून ती पुणे विद्यापीठ व ,महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाशी संलग्न असून त्यांचे जीवशास्त्राशी संबंधीत पदव्युत्तर व पीएच.डी.चे अभ्यासक्रम राबवते. त्या शिवाय ही संस्था भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने जैवविज्ञानाशी संबधित संशोधन प्रकल्प हाती घेते.

आघारकर संशोधन संस्थेची- Agharkar Research Institute (ARI)-स्थापना १९४६ मध्ये महाराष्ट्र ॲसोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेस (MACS) नावाने झाली. ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉ शंकर पुरुषोत्तम आघारकर यांनी या संस्थेची स्थापना केली. १९९२ मध्ये संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले.

बाह्य दुवे

[संपादन]