मिरज
?मिरज महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | सांगली |
मिरज हे दक्षिण महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे शहर आहे आणि भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे.सांगली जिल्ह्यातील दुसरे मोठे शहर आहे. मिरज एक महानगरपालिका सुद्धा आहे. मिरजेचा इतिहास गेल्या एक हजार वर्षांपासून ज्ञात आहे. ते आदिलशाहीतील एक महत्त्वाचे ठिकाण होते.
मिरज हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे. वैद्यकीय सोईसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही पश्चिम महाराष्ट्रात मिरज शहर सर्वात प्रसिद्ध आहे.
मिरज शहरात वानलेस मेमोरियल रुग्णालय, वानलेस उरो रुग्णालय, मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे सिद्धिविनायक कर्करोग रुग्णालय आणि इतर अनेक रुग्णालये आहेत. शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा आहे. दर्जेदार वैद्यकीय सोयींची उपलब्धता आणि रुग्णांना लवकर उतार पडेल अशी हवा या कारणांमुळे महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधूनही अनेक लोक औषध उपचारासाठी मिरजेला येतात. यामुळेच मिरजेला आरोग्य पंढरी म्हटली जाते.
मिरज शहर हे विविध प्रकारच्या तंतुवाद्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात गायक उस्ताद अब्दुल करीम खान यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते..त्यांच्या नावाने दरवर्षी संगीत महोत्सव भरवला जातो.मिरजेतील उरूस प्रसिद्ध आहे.
मिरासाहेब दर्गा, मिरज मिरसाहेब दर्गा ही मिरजच्या रेल्वे स्टेशनजवळ स्थित मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समुदायांसाठी एक सामान्य उपासना केंद्र आहे.
हजरात मीरासाहेब आणि त्यांचा मुलगा हजरत शमासुद्दीन हुसैन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दर गुरुवारी सकाळी हजारो लोक दरगाहकडे येतात. हजरत मीरासाहेब त्यांच्या काळातील एक सुफी संत होते. असे म्हणले जाते की अल्लाहच्या आज्ञेवरून ते मक्का (सौदी अरेबिया) येथून भारतात आले होते. त्यांनी आपल्या जीवनातून इस्लामचा प्रचार केला. दरवर्षी साजरा होणाऱ्या सणात लाखो लोक याठिकाणी भेट देतात व त्यांच्या शुभेच्छा देतात.
इतिहास
[संपादन]मिरज सीनियर (थोरली पाती) हे संस्थान दिनांक ८ मार्च १९४८ रोजी उर्वरित भारतात विलीन झाले व ते आता महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. मिरज शहर हे
१. इ.स. १०२४ पासून शिलाहार राजवंशातील नरसिंहाच्या नियत्रणाखाली होते.
२. इ.स. १२१६-१३१६ याकाळात ते देवगिरीच्या यादववंशाच्या राज्याचा भाग होते.
३. इ.स. १३९५ मध्ये मिरज शहर बहामनी राज्यात सामील झाले.
४. इ.स. १३९१-१४०३ या काळात येतेहे राणी दुर्गा देवीची कारकीर्द होती.
.
५. इ.स. १४२३मध्ये हे शहर मलिक इमाद उल मुल्कच्या ताब्यात गेले.
६. इ.स. १४९४मध्ये बहादूर गिलानीने बंड केले.
.
७. इ.स. १६६०मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे मिरजेत दोन महिने वास्तव्य होते.
८. इ.स. १६८०त संताजी घोरपडे मिरजचे देशमुख होते.
९. इ.स. १६८६मध्ये मिरज औरंगजेबाच्या हातात गेले.
१०.इ.स. १७३०मध्ये पंत प्रतिनिधींनी परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आणले.
.
भूगोल
[संपादन]प्रमुख भाग
[संपादन]- ब्राम्हणपुरी - हा भाग शहराचा मध्यवर्ती रहिवासी भाग म्हणून ओळखला जातो. पूर्वी या ठिकाणी मोठमोठाले वाडे होते, परंतु वाढत्या शहरीकरणाच्या, विकासाच्या व जागेच्या टंचाईच्या ओघात ह्या वाड्यांची जागा अपार्टमेंट्सनी घेतली आहे.
- किल्ला भाग - हा भाग देखील महत्त्वाचा आहे किल्ला आहे. यामध्ये प्रसिंद्ध आहे. पूर्वी येथे भुईकोट किल्ला होता परंतु तो सध्या अस्तित्वात नाही.
उपनगरे
[संपादन]- कृपामयी
- खोतनगर
- गगनगिरीनगर
- चंदनवाडी, टिळकनगर
- दत्तकॉलनी, इंदिरानगर
- बेथलनगर
- भारतनगर
- माणिकनगर
- वड्डी
- वानलेसवाडी
- समतानगर
- सुभाषनगर)
- किल्ला भाग
हवामान
[संपादन][लपवा]मिरज साठी हवामान तपशील | |||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
महिना | जाने | फेब्रु | मार्च | एप्रिल | मे | जून | जुलै | ऑगस्ट | सप्टें | ऑक्टो | नोव्हें | डिसें | वर्ष |
सरासरी कमाल °से (°फॅ) | 30.5 (86.9) |
32.8 (91) |
36.1 (97) |
37.9 (100.2) |
37.5 (99.5) |
31.5 (88.7) |
27.9 (82.2) |
28.2 (82.8) |
29.2 (84.6) |
31.0 (87.8) |
30.1 (86.2) |
29.5 (85.1) |
31.85 (89.33) |
सरासरी किमान °से (°फॅ) | 14.1 (57.4) |
15.2 (59.4) |
18.5 (65.3) |
21.5 (70.7) |
22.7 (72.9) |
22.3 (72.1) |
21.7 (71.1) |
21.2 (70.2) |
20.2 (68.4) |
20.1 (68.2) |
17.3 (63.1) |
14.3 (57.7) |
19.09 (66.38) |
सरासरी वर्षाव मिमी (इंच) | 4.1 (0.161) |
0.5 (0.02) |
3.8 (0.15) |
32.0 (1.26) |
56.4 (2.22) |
70.4 (2.772) |
110.0 (4.331) |
110.7 (4.358) |
105.2 (4.142) |
95.8 (3.772) |
41.1 (1.618) |
5.1 (0.201) |
635.1 (25.005) |
स्रोत: [१] "Government of Maharashtra" |
जैवविविधता
[संपादन]मिरज परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे.
अर्थकारण
[संपादन]बाजारपेठ
[संपादन]- लक्ष्मी मार्केट - ही शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. येथे अनेक प्रकारची दुकाने, हॉटेले, त्याचबरोबर भाजीपाला व फळांची दुकाने आहेत. लक्ष्मी मार्केटची इमारत अतिशय भव्य व ब्रिटिशकालीन आहे.
- अत्तार् ट्रेड्रर्स - शनिवार पेठेतील विश्वसनिय नाव असलेले कन्फेक्शनरी ( बेकरी बटर कुकीज, बेकरी चॉकलेट बिस्किटे, नमकीन आणि स्नॅक्स) दुकान्
नागरी प्रशासन
[संपादन]शहरातील प्रशासन सांगली मिरज-कुपवाड महानगरपालिकेमार्फत होते व याचे मुख्यालय सांगली येथे आहे.या महानगरपालिकेमार्फत दररोज शहराची स्वच्छता केली जाते.सर्व सण उत्सवांना स्वच्छता केली जाते. पालिकेचा कारभार सुरळीत सुरू असतो. नेहमी नवनवीन योजना राबवल्या जातात.
जिल्हा प्रशासन
[संपादन]सांगली जिल्हापरिषद
वाहतूक व्यवस्था
[संपादन]रेल्वे वाहतूक
[संपादन]मिरज हे मध्य रेल्वेच्या पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील एक महत्त्वाचे व पश्चिम महाराष्ट्रातील मोठे जंक्शन आहे. ब्रॉड गेज, स्मॉल गेज आणि मीटर गेज - ह्या तीन रेल्वे गेजांचा येथे संगम होता.
स्मॉलगेजवरची शेवटची गाडी १ नोव्हेबर २००८ पासून बंद झाली. मिरजला आता फक्त ब्रॉड गेजचे रूळ आहेत. ही रेल्वेलाईन एका बाजूने पु्ण्याला जोडली गेली आहे. उत्तरेला ती कुर्डूवाडीला व पंढरपूरला, नैर्ऋत्येला लोंढा जंक्शनमार्गे गोव्याला, तर दक्षिणेला ते हुबळीशी जोडले आहे. मिरज-कोल्हापूर असाही एक रेल्वेमार्ग आहे. कोल्हापूरपासून ते सांगली- सोलापूरपर्यंत पॅसेंजर ट्रेन धावतात. मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी ही गाडी फेब्रुवारी २०११ मध्ये ब्रॉड गेज रुळावर धावू लागली. मिरज रेल्वे जंक्शन हे सांगली जिल्ह्याचे महत्त्वाचे दळणवळणाचे साधन आहे.
रस्ते वाहतूक
[संपादन]महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली विभागतील मिरज बसस्थानकामध्ये हिरकणी,निमआराम,शयनयान आसनी व शिवशाही बसेस मिरजेला महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व प्रमुख शहरांसोबत जोडतात. शहरांतर्गत वाहतूकीसाठी शहरी परिवहन बसेस सांगली, मिरज, कुपवाड,जयसिंगपूर, माधवनगर,अहिल्रियानगर उपलब्ध आहेत.मोठ्या प्रमाणात महाविद्यालये असल्यामुळे वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे मिरज मध्ये कोणत्याही वाहतूकीच्या अडचणी निर्माण होत नाहीत.आता येथून शासनातर्फे 'शिवशाही' ही वातानुकुलीत बससेवा सुरू झाली आहे.या वातानुकुलीत बससेवेद्वारे सांगली मुंबई,पुणे,औरंगाबाद,शेगांव, नाशिक,सोलापूर,लातूर,नांदेड या शहरांना जोडले गेले आहे. रत्नागिरी ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाला असून तो मिरज शहरामधून जातो बस व ऑटो(रिक्षा) ही वाहतूकीची प्रमुख साधने आहेत.खाजगी वाहनांची संख्या लक्षणीय आहे. मिरज शहरामध्ये वाहतूकीचे नियम हे पाळले जातात.
लोकजीवन
[संपादन]येथील लोक मराठी भाषिक आहेत. बरेचजण वाद्यांचा व्यवसाय करतात. हिंदू, मुस्लिम व ख्रिस्ती लोक इथे प्रामुख्याने राहतात.मिरज मध्ये मिरज उरुस दरवर्षी १५ दिवस भरतो, दर्गा भाविकांचे श्रद्धास्थान असलेले एक हा मिरासाहेब दर्गा.
संस्कृती
[संपादन]रंगभूमी
[संपादन]मिरजेतील लक्ष्मी मार्केटपासून पूर्वेस बालगंधर्व नाट्य मंदिर आहे. पं. विष्णू दिगंबर पलुसकर, उस्ताद अब्दुल करीम खान, पंडित निकालके. भातखंडे, हिराबाई बडोदेकर आणि पं. विनायकराव पटवर्धन हे मिरजेचे प्रसिद्ध गायक होते.. बाल गंधर्वांनी आपले पहिले नाटक मिरजेतील हंसप्रभा रंगमंचावर लावले होते. त्यांच्या नावाचे नवनिर्मित बालगंधर्व नाट्यगृह मिरजेत आहे. उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या स्मरणार्थ ख्वाजा शमसुद्दीन मीरा साहेब वार्षिक संगीत महोत्सव साजरा होतो.मिरजेतील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या या समृद्ध परंपरेमुळे मिरजेचे स्थान देशात उलेखनीय असे आहे.
चित्रपटगृहे
[संपादन]मिरज येथे चित्रपट व्यवसाय ही चालतो. शहरात अनेक चित्रपटगृहे आहेत. या शहरास तालुका असल्यामुळे चित्रपट व्यवसायास त्याचा फायदा झालेला आहे.
- एस.टी.स्टॅन्ड परिसरात अमर टोकीज हे मिरजेतील प्रसिद्ध चित्रपटगृह आहे.
- लक्ष्मी मार्केट परिसरातील देवल सिनेमागृह.
- महात्मा गांधी रोडचे आशा सिनेमागृह.
- माधव टॉकीज
- मंगल टॉकीज
धर्म- अध्यात्म
[संपादन]अपवाद वगळता सर्व धर्मीय लोक इथे गुण्या गोविंदाने राहतात.
खवय्येगिरी
[संपादन]मिरजेमधे लक्ष्मी मार्केट परिसर आणि शिवाजी रोड, सांगली-मिरज रोड या ठिकाणी खाद्यपदार्थाची दुकाने आहेत. मार्केट परिसरातील बसप्पा हलवाई पेढ्यांसाठी व मिठाईसाठी प्रसिद्ध आहे. मिरजेमधील शिवाजी रोडवरील हॉटेले आणि पंढरपूर रोडचे ढाबे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
प्रसारमाध्यमे
[संपादन]शिक्षण
[संपादन]प्राथमिक व विशेष शिक्षण
[संपादन]- UB's English School
महाविद्यालये
[संपादन]- कन्या महाविद्यालय
- शिक्षण महर्षि डॉ बापूजी साळुंखे महाविद्यालय
- मिरज महाविद्यालय
- वसंतदादा पाटील मॅनेजमेंट महाविद्यालय
- संजय भोकरे इंजिनिअरिंग महाविद्यालय
संशोधन संस्था
[संपादन]जवळील शहरे
[संपादन]आरग, वड्डी, सांगली, कुपवाड, इनाम धामणी, मालगांव, टाकळी,बोलवाड, मल्लेवाडी अंकली, मौजे डिग्रज, बेळंकी, सलगरे, शिपुर, एरंडोली, सोनी म्हैसाळ
लष्करी शिक्षण व संशोधन संस्था
[संपादन]खेळ
[संपादन]क्रिकेट फुटबॉल
पर्यटन स्थळे
[संपादन]पूर्वी मिरजेत भरपूर पर्यटन स्थळे होती. मिरजेच्या पूर्वेस असणाऱ्या बेळंकी गावांत अजूनही काही ऐतिहासिक स्थळ आहेत , प्राचीन विहीर ही बेळंकीच्या gangatek (गंगाटेक) येथे आहे . स्थानिक लोकांच्या मते ही विहीर रामाने वनवासाच्या वेळी सीतेसाठी बनवली होती. अत्यंत दुष्काळी वातावरणात देखील या विहिरीचं पाणी कमी होत नाही . उत्तरेस पन्हाळाचे काम चालू होतं . शिवाजी महाराज स्वतः या ठिकाणी आले होते . बांधकामाचे काही अवशेष इथे अजूनही सापडतात. 1000 वर्षांपूर्वी बांधलेले सिद्धेश्वर मंदिर आहे.
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |