उद्धव ठाकरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
उद्धव ठाकरे
Uddhav thackeray 20090703.jpg
जन्म उद्धव बाळासाहेब ठाकरे
२७ जुलै, इ.स. १९६०
पेशा राजकारण, छायाचित्रण
राजकीय पक्ष शिवसेना
धर्म हिंदू धर्म
जोडीदार रश्मी ठाकरे
अपत्ये आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे
वडील बाळासाहेब ठाकरे
आई मीनाताई ठाकरे
नातेवाईक राज ठाकरे (चुलतभाऊ)
संकेतस्थळ
"अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश व मराठी मजकूर). 

उद्धव ठाकरे (२७ जुलै, इ.स. १९६० - हयात) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष, छायाचित्रकार आहेत. इ.स. २००३ साली उद्धव ठाकऱ्यांचे वडील - शिवसेना-संस्थापक व तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे - यांच्याकडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकऱ्यांकडे आली.

राजकीय कारकीर्द[संपादन]

आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. इ.स. २००२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेनेला विजयश्री व त्यासह सत्ताही लाभली. पुढील वर्षी इ.स. २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र या काळात तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मतभेद वाढत राहिले आणि अखेरीस नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली[ संदर्भ हवा ]. उद्धव ठाकरे व त्यांचे चुलतभाऊ राज ठाकरे यांच्यातील दरीही रुंदावत गेली; परिणामी इ.स. २००६ साली राज ठाकऱ्यांनी शिवसेना सोडली व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली [ संदर्भ हवा ].

२०१५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाशीही युती न करता ६३ आमदार निवडून आणले.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.