Jump to content

विप्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विप्रो टेक्नोलॉजिझ
ब्रीदवाक्य अप्प्लाइंग थॉट्स
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र माहिती तंत्रज्ञान
स्थापना इ.स. १९७९
संस्थापक अझीम प्रेमजी
मुख्यालय बंगळूर, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती अझीम प्रेमजी (अध्यक्ष)
गिरीश परांजपे (सह-मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक)
सुरेश वासवानी (सह-मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक)
डॉ. ए. एल. राव (मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी)
सुदिप नंदी (प्रमुख कार्यकारी - दुरसंचार आणि उत्पादन अभियांत्रिकी)
सेवा माहिती तंत्रज्ञान अनुषांगिक सेवा
महसूली उत्पन्न ४ अब्ज ३ कोटी अमेरिकन डॉलर (२००७-०८)
कर्मचारी ९४,००० (मार्च ३१, २००८ रोजी)
संकेतस्थळ विप्रो.कॉम

विप्रो टेक्नॉलॉजीज (बीएसई.507685, एनएसई.WIPRO) ही अझीम प्रेमजी यांच्या विप्रो कारपोरेशन या उद्योगसमुहातील सर्वात मोठी कंपनी आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षात ४.३ अब्ज अमेरिकन डॉलर उत्पन्न, ९४००० कर्मचारी आणि जगभरातील ५३ विकसन केंद्रे असलेली विप्रो टेक्नोलॉजीज ही भारतीय माहिती तंत्रज्ञान झेत्रातील महसुलाद्वारे क्रमांक ३ची कंपनी आहे. सिक्स्-सिग्मा, एस.इ.आय.-सी.एम.एम., बी.एस.-१५००० ही गुणवत्तेची विविध आंतरराष्ट्रीय मानांकने विप्रोच्या विकसन केंद्रांना प्रदान करण्यात आली आहेत.

इतिहास[संपादन]

विप्रो उद्योगसमूहाचीं सुरुवात अझीम प्रेमजी यांच्या वडिलांनी १९४७ साली वनस्पतीजन्य, साबण वगैरे तत्सम गॄहोपयोगी उत्पादनापासुन सुरू केली. १९६६ साली वडिलांच्या निधनानंतर २१ व्या वर्षी अझीम प्रेमजी यांना उद्योगसमूहाची सुत्रे हाती घ्यावी लागली. त्यावेळी, प्रेमजी अमेरीकेच्य स्टॅन्फोर्ड विद्यापीठात विद्युत अभियांत्रिकीचा पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करीत होते. पदवी अभ्यासक्रम सोडुन देउन प्रेमजी यांनी भारताचा मार्ग धरला त्यावेळी विप्रोची वार्षिक उलाढाल २० लाख अमेरिकी डॉलर इतकी होती. प्रेमजी यांनी विप्रोच्या वाढीसाठी विविध क्षेत्रात उडी घेतली. १९७७ साली आय. बी. एम.च्या भारतातून झालेल्या उचलबांगडीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रेमजी यांना संगणक व अनुषांगिक सेवांच्या व्यवसायाची नविनच संधी मिळाली. १९८१ साली प्रेमजी यांनी विप्रो-निर्मित संगणक भारतीय बाजारात उतरवला. या व्यवसायात वाढ होत प्रेमजी यांनी २००० साली विप्रोची न्यू यॉर्क रोखे-विनिमय बाजारात अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट साठी नोंदणी केली.

जागतिक कार्यालये आणि विकसन केंद्रे[संपादन]

भारत[संपादन]

बंगळूर, भोपाळ, चंदिगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पुणे, सिकंदराबाद

आशिया-प्रशांत[संपादन]

जपान, मलेशिया, सिंगापुर, तैवान, चीन, ऑस्ट्रेलिया

युरोप[संपादन]

ऑस्ट्रिया, फिनलंड, फ्रांस, जर्मनी, इटली, बेनेलक्स, पोर्तुगाल, रुमानिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंग्डम

उत्तर अमेरिका[संपादन]

कॅनडा, मेक्सिको, अमेरिकेची संयुक्त संस्थाने

दक्षिण अमेरिका[संपादन]

ब्राझिल

मध्य पूर्व आशिया[संपादन]

संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया

आफ्रिका[संपादन]

दक्षिण आफ्रिका

सेवा आणि उत्पादने[संपादन]

माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रे (Information Technology Services)[संपादन]

माहिती तंत्रज्ञान सेवा (IT Services)
उत्पादन अभियांत्रिकी (Product Engineering Solutions)
तंत्रज्ञान पायाभूत सेवा (Technology Infrastructure Services)
बिझनेस प्रोसेस आउट्सोर्सिंग (Business Process Outsourcing)
सल्ला सेवा (Consulting Services)

उद्योग क्षेत्रे[संपादन]

साधनसंपत्ती वितरण सेवा (Utilities)
सरकार (Government)
आरोग्य आणि आयुर्शास्त्र (Healthcare and Life Science)
उच्च तंत्रद्यान (Hi-Tech)
विमा (Insurance)
उत्पादन (Manufacturing)
किरकोळ व्यापार आणि ग्राहकोपयोगी वस्तु (Retail and Consumer Goods)
दुरसंचार (Telecom)
प्रवास आणि परिवहन (Travel and Transportation)
माध्यमे आणि मनोरंजन (Media & Entertainment)
संरक्षण (Defense)
रसायनी (Chemical)
वित्त (Finance)

पुरस्कार आणि मान्यता[संपादन]

  • विप्रोला एटीडीचा सर्वोत्कृष्ट  पुरस्कार २०१८ मध्ये मिळाला.[१]
  • मार्च २०१७ मध्ये विप्रोला सलग सहा वर्ष यूएस-आधारित एथिसियर इन्स्टिट्यूटने जगातील सर्वात नीतिनिक कंपनी म्हणून मान्यता दिली गेली.[२][३]
  • विप्रोने २०१५ मध्ये ७ पुरस्कार जिंकले. भारतात २०१५ मध्ये विप्रोने सीआयओ चॉइस अवॉर्ड मध्ये बेस्ट मॅनेज्ड आयटी सर्व्हिसेस आणि बेस्ट सिस्टम इंटिग्रेट हे पुरस्कार जिंकले.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "ATD's 2018 BEST Award Winners Revealed". www.td.org (इंग्रजी भाषेत). 2020-04-04 रोजी पाहिले.
  2. ^ Newsdesk, Asian Lite. "Wipro voted world's most ethical firm | Local News and Newspaper Comments for Asians/Indians" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2020-04-22. 2020-04-04 रोजी पाहिले.
  3. ^ "Wipro World's Most Ethical company : Ethisphere Institute". www.indiainfoline.com (इंग्रजी भाषेत). 2020-04-04 रोजी पाहिले.
  4. ^ ANI (2015-02-19). "Wipro wins seven awards at CIO Choice Honor and Recognition 2015". Business Standard India. 2020-04-04 रोजी पाहिले.