जळगाव जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जळगाव जिल्हा
जळगाव जिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा
MaharashtraJalgaon.png
महाराष्ट्रच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव नाशिक विभाग
मुख्यालय जळगाव
क्षेत्रफळ ११,७६५ चौरस किमी (४,५४२ चौ. मैल)
लोकसंख्या ४२,२४,४२४ (२०११)
साक्षरता दर ७९.७३%
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल
लोकसभा मतदारसंघ जळगाव (लोकसभा मतदारसंघ), रावेर (लोकसभा मतदारसंघ)
पर्जन्यमान ६९० मिलीमीटर (२७ इंच)
संकेतस्थळ


हा लेख जळगाव जिल्ह्याविषयी आहे. जळगाव शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
जळगाव जिल्ह्याचे स्थान

परिचय[संपादन]

जळगाव जिल्ह्यास पूर्वी पूर्व खानदेश असे संबोधले जात असे. जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, दक्षिण-पूर्व दिशेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , दक्षिण-पश्चिमेस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते, ही शेती भारतातील इतर शेतक-यांच्या साठी एक आदर्श उदाहरण आहे. जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे.

जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० कि.मि² आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंता पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जिल्हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणी देखील बोलली जाते. जिल्ह्यात सरासरी ६९० मि.मि इतका पाऊस पडतो. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- ताप्ती, पूर्णा, गिरणा, वाघूर

प्रसिद्ध कवी बालकवी व कवियत्री बहिणाबाई चौधरी ह्या जळगाव जिल्ह्यातील आहेत तर साने गुरुजी ह्यांची ही कर्मभूमी होय.

जळगाव जिल्ह्याचा नकाशा

तालुके[संपादन]

जळगाव जिल्ह्यात पुढिल १५ तालुक्यांचा समावेश होतो.
चाळीसगाव, भडगांव, पाचोरा, जामनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, जळगाव तालुका, भुसावळ, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, यावल, रावेरबोदवड.

महत्त्वाची पिके[संपादन]

ज्वारी हे महत्त्वाचे अन्नधान्याचे पिक असुन त्यासोबत गहु व बाजरी चे ही पिक घेतेले जाते. तसेच कापुस हे प्रमुख नगदी पिक घेतले जाते. तेलबियांमध्ये प्रामुख्याने भुईमुग व तिळ हे पिक, केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. पपई, द्राक्ष,बोरे, मेहरुणची बोरे, चिकु, सिताफळ, लिंबु, कागदी लिंबु, मोसंबी, टरबुज इ. फळांचही उत्पादन घेतेले जाते. कडधान्ये पिकांमध्ये हरभरा, तुर, मुग, मटकी, उडिद, चवळी इ. उत्पादन होते.


जिल्ह्यातील पर्यटनस्थळे[संपादन]

 • श्री पद्मालय,एरंडोल (अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ),
 • पारोळा येथिल भुईकोट किल्ला (झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचा किल्ला),
 • पाल (रावेर तालुका)-थंड हवेचे ठिकाण,
 • यावल येथिल भुईकोट किल्ला,
 • फारकंडे मनोरा,
 • चाळिसगाव तालुक्यातील पाटणादेवी (थोर गणिती शास्त्रज्ञ भास्कराचार्य यांचे जन्मस्थळ व पाटणादेवी देवस्थान) कालीमठ व गंगाश्रम,
 • उनपदेव-सुनपदेव (चोपडा) गरम पाण्याचे झरे,
 • संत मुक्ताबाई मंदिर (मुक्ताईनगर),
 • संत चांगदेव मंदिर,
 • मनुदेवी मंदिर,
 • ओंकारेश्वर मंदिर (जळगाव शहर),
 • अमळनेर येथिल भुईकोट किल्ला व साने गुरुजींचे तत्त्वज्ञान मंदिर.
 • वढोदा येथील प्राचीन मच्छिंद्रनाथ मंदिर

प्रमुख उद्योगधंदे व औद्योगिक क्षेत्रे[संपादन]

जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती, वनस्पती तुप व तेल गिरण्या, युद्धसाहित्य - निर्मिती वरणगाव व भुसावळ, अन्नप्रक्रिया उद्योग इ.

औद्योगिक क्षेत्रे : जळगाव, चाळिसगाव, भुसावळ, पाचोरा, वरणगाव, अमळनेर, एरंडोल.


संदर्भ[संपादन]