Jump to content

"हिराबाई पेडणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
त्यांची संगीत जयद्रथ-विडंबन (इ.स.१९०४)<ref name=":0">Gender, Culture, and Performance: Marathi Theatre and Cinema before Independence, ले. मीरा कोसंबी, रूटलेज प्रकाशन, जुलै २०१७.</ref> आणि संगीत दामिनी (प्रथम प्रयोग इ.स.१९०८, प्रकाशित इ.स. १९१२)<ref name=":0" /> ही नाटके रंगभूमीवर गाजली. त्यांनी लिहिलेल्या [[मीराबाई]]च्या आणि कवी जयदेवाची पत्नी यांच्यावरच्या दोनही नाटकांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.

हिराबाई पेडणेकरांच्या जीवनावर [[वसंत कानेटकर |वसंत कानेटकरांनी]] 'कस्तुरीमृग' हे नाटक लिहिले होते.
हिराबाई पेडणेकरांच्या जीवनावर [[वसंत कानेटकर |वसंत कानेटकरांनी]] 'कस्तुरीमृग' हे नाटक लिहिले होते.

==संगीतकार म्हणून कारकीर्द==
==संगीतकार म्हणून कारकीर्द==
हिराबाईंनी श्री.कृ.कोल्हटकरांच्या 'प्रेमशोधन' (१९१०) या आणि गडकऱ्यांच्या 'पुण्यप्रभाव' (१९१६) या नाटकांना संगीत दिले होते.
हिराबाईंनी श्री.कृ.कोल्हटकरांच्या 'प्रेमशोधन' (१९१०) या आणि गडकऱ्यांच्या 'पुण्यप्रभाव' (१९१६) या नाटकांना संगीत दिले होते.

==हिराबाई पेडणेकरांसंबंधी पुस्तके==
* कस्तुतीमृग (नाटक, लेखक - [[वसंत कानेटकर]])
* हिराबाई पेडणेकर (चरित्र, लेखिका - शिल्पा सुर्वे)

== संदर्भ ==
== संदर्भ ==

१४:२०, ८ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

हिराबाई पॆडणेकर (जन्म :सावंतवाडी २२ नोव्हेंबर १८८६; मृत्यू : पालशेत-रत्नागिरी १८ ऑक्टोबर १९५१) [ संदर्भ हवा ] यांच्या घराण्यातच नृत्य, संगीत या कला होत्या. त्यांना चागले संस्कृत येत होते. त्या मराठीत उत्तम कविताही करीत. त्यांच्या कविता मनोरंजन या मासिकात प्रसिद्ध होत. त्यांचे संगीतातले अधिक शिक्षण भास्करबुवा बखले यांच्याकडे झाले.

गुर्जरशास्त्री यांच्याकडून हिराबाईंनी, संस्कृत नाट्यशास्त्र, आणि नाट्यवाङ्‌मय यांच्या सूक्ष्म अभ्यासासाठी मार्गदर्शन घेतले. गोविंद बल्लाळ देवल यांच्या प्रेरणेने त्यांना मराठी नाटकाची गोडी लागली. पुढे मराठी साहित्यिक राम गणेश गडकरी, बालकवी ठोंबरे यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यानंतर हिराबाई पेडणेकरांचा अण्णासाहेब किर्लोस्कर आणि बालगंधर्व यांच्यासारख्या नाट्यक्षेत्रातील मंडळींशी, आणि पुढे नानासाहेब फाटक, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याशी घनिष्ट संबंध आला. या मंडळींकडून स्फूर्ती घेऊन हिराबाई पेडणेकर स्वतःच नाटककार झाल्या.

त्यांची संगीत जयद्रथ-विडंबन (इ.स.१९०४)[] आणि संगीत दामिनी (प्रथम प्रयोग इ.स.१९०८, प्रकाशित इ.स. १९१२)[] ही नाटके रंगभूमीवर गाजली. त्यांनी लिहिलेल्या मीराबाईच्या आणि कवी जयदेवाची पत्नी यांच्यावरच्या दोनही नाटकांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.

हिराबाई पेडणेकरांच्या जीवनावर वसंत कानेटकरांनी 'कस्तुरीमृग' हे नाटक लिहिले होते.

संगीतकार म्हणून कारकीर्द

हिराबाईंनी श्री.कृ.कोल्हटकरांच्या 'प्रेमशोधन' (१९१०) या आणि गडकऱ्यांच्या 'पुण्यप्रभाव' (१९१६) या नाटकांना संगीत दिले होते.

हिराबाई पेडणेकरांसंबंधी पुस्तके

  • कस्तुतीमृग (नाटक, लेखक - वसंत कानेटकर)
  • हिराबाई पेडणेकर (चरित्र, लेखिका - शिल्पा सुर्वे)

संदर्भ

  1. ^ a b Gender, Culture, and Performance: Marathi Theatre and Cinema before Independence, ले. मीरा कोसंबी, रूटलेज प्रकाशन, जुलै २०१७.