Jump to content

वसंत कानेटकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वसंत कानेटकर
जन्म नाव वसंत शंकर कानेटकर
जन्म मार्च २०, इ.स. १९२२
रहिमतपूर जि .सातारा
मृत्यू जानेवारी ३१, इ.स. २००१
नाशिक
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
कार्यक्षेत्र नाटककार, लेखक
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटके, कादंबऱ्या
विषय मराठी
वडील शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश )

प्रा. वसंत शंकर कानेटकर (जन्म : रहिमतपूर, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, २० मार्च १९२२; - ३१ जानेवारी २००१) हे मराठी नाटककार होते.

जीवन[संपादन]

कानेटकरांचा जन्म मार्च २०, इ.स. १९२२ रोजी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे झाला. मराठी भाषेतील कवी गिरीश त्यांचे वडील होते. नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांचे अखेरपर्यंत वास्तव्य नाशिक येथील ‘शिवाई’ बंगला येथे होते. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच.पी.टी. महाविद्यालयात (हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयात) ते प्राध्यापक होते.[१]

प्रकाशित साहित्य[संपादन]

कानेटकरांनी ४३ नाटके व ४ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची नाटके व्यावसायिकदृष्ट्या खूप यशस्वी झाली.

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अखेरचा सवाल नाटक
अश्रूंची झाली फुले नाटक पॉप्युलर प्रकाशन
आकाशमिठी परचुरे प्रकाशन
आनंदीबाई आणीबाणी पुकारतात एकांकिका मनोरमा प्रकाशन
इथे ओशाळला मृत्यू नाटक
एक रूप- अनेक रंग नाटक
कधीतरी कोठेतरी नाटक
कवी आणि कवित्व धी गोवा हिंदु असोसिएशन
कस्तुरीमृग नाटक
गगनभेदी नाटक
गरुडझेप नाटक सहलेखक रणजित देसाई मेहता प्रकाशन
गाठ आहे माझ्याशी नाटक
गोष्ट जन्मांतरीची नाटक पॉपुलर प्रकाशन
छू मंतर नाटक मजेस्टिक प्रकाशन, पॉपुलर प्रकाशन
झेंडे पाटील महाविद्यालयात गंगू, अंबू, विठा नाटक पॉप्युलर प्रकाशन
जिथे गवतास भाले फुटतात नाटक परचुरे प्रकाशन
तुझा तू वाढवी राजा नाटक पॉप्युलर प्रकाशन
तू तर चाफेकळी नाटक
देवांचे मनोराज्य नाटक
दोन ध्रुवांवर दोघे आपण नाटक
नलदमयंती नाटक परचुरे प्रकाशन
पंखांना ओढ पावलांची नाटक काँटिनेंटल प्रकाशन
प्रिय आईस नाटक
प्रेमाच्या गावा जावे नाटक पॉपुलर प्रकाशन
प्रेमात सगळंच माफ ! नाटक मेहता प्रकाशन
प्रेमा तुझा रंग कसा नाटक पॉप्युलर प्रकाशन
फक्त एकच कारण नाटक
बेइमान नाटक
मत्स्यगंधा नाटक
मदनबाधा नाटक
मद्राशीने केला मराठी भ्रतार एकांकिका पॉप्युलर प्रकाशन
मला काही सांगायचंय नाटक पॉप्युलर प्रकाशन
माणसाला डंख मातीचा नाटक
मास्तर एके मास्तर नाटक
मीरा...मधुरा नाटक
मोहिनी नाटक
रंग उमलत्या मनाचे नाटक परचुरे प्रकाशन
रायगडाला जेव्हा जाग येते नाटक पॉप्युलर प्रकाशन
लेकुरे उदंड झाली नाटक
वादळ माणसाळतंय नाटक पॉप्युलर प्रकाशन
विषवृक्षाची छाया नाटक पॉप्युलर प्रकाशन
वेड्याचं घर उन्हात नाटक
शहाण्याला मार शब्दांचा एकांकिका परचुरे प्रकाशन
शिवशाहीचा शोध परचुरे प्रकाशन
सुख पाहता नाटक परचुरे प्रकाशन
सूर्याची पिल्ले नाटक
सोनचाफा नाटक परचुरे प्रकाशन
हिमालयाची सावली नाटक पॉप्युलर प्रकाशन

कानेटकरांच्या नाटकांचे हिंदी अनुवाद(क)[संपादन]

 • अश्रूंची झाली फुले - आंसू बन गये फूल (सुनीता कट्टी, १९८०)
 • कस्तुरीमृग - चेहरों का पुरुष (डाॅ. कुसुम कुमार बिन, १९७७)
 • गगनभेदी - गगनभेदी (प्रशांत पांडे)
 • गाठ आहे माझ्याशी - मुकाबला मुझसे है (पद्मा नलगंडवार, १९८५)
 • गाठ आहे माझ्याशी - टक्कर मुझसे है (सरोजिनी वर्मा, १९८३)
 • प्रेम तुझा रंग कसा? - ढाई आखर प्रेम का (वसंत देव, १९६५)
 • प्रेमाच्या गावा जावे - प्रेम नगरिया जाना है (?)
 • मला काही सांगायचं आहे - मुझे कुछ कहना है (डाॅ. सुधाकर कलावडे, १९८०)
 • मत्स्यगंधा - मत्स्यगंधा (?)
 • रायगडाला जेव्या जाग येते - जाग उठा है रायगढ (वसंत देव, १९६४)
 • वेड्याचं घर उन्हात - जंजीर (सीमा विश्वास, १९६४)
 • वेड्याचं घर उन्हात - धूप के साये (वसंत देव, १९६४)

कानेटकरांच्या नाटकांचे गुजराती अनुवाद(क)[संपादन]

 • अखेरचा सवाल - अमे बरफना पंखी (१९७५)
 • अश्रूंची झाली फुले - आतमने ओझलमां राखमा (?)
 • गोष्ट जन्मांतरीची - पुनर्मिलन (अनिल मेहता, १९७९)
 • घरात फुलला पारिजात - पारिजात (?)
 • प्रेमा तुझा रंग कसा? - पढो रे पॊपट बोल प्रेमना (चंद्रिका लालू शहा)
 • मला काही सांगायचं आहे - ऊपर गगन नीचे धरती (१९७९)
 • रायगडला जेव्हा जाग येते - रायगड ज्यारे जागे छे (?)
 • हिमालयाची सावली - नोखी माटी ने नोखा मानवी (तारक मेहता, १९७२)

कानेटकरांच्या नाटकांचे कानडी अनुवाद(क)[संपादन]

 • अश्रूंची झाली फुले - सत्यं वद धर्मं चर (श्री. सेलूर, १९६२)

जीवन नाट्ये[संपादन]

वसंत कानेटकरांनी हिराबाई पेडणेकर यांच्या जीवनावर कस्तुरीमृग, बाबा आमटे यांच्या जीवनावर वादळ माणसाळतंय, इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांच्या जीवनावर विषवृक्षाची छाया आणि महर्षी कर्वे आणि बायो यांच्या जीवनावर हिमालयाची सावली ही नाटके लिहिली.

संगीत नाटक[संपादन]

वसंत कानेटकरांच्या कादंबऱ्या[संपादन]

 • घर (वसंत देवांनी या कादंबरीचा हिंदी अनुवाद केला आहे.)
 • तिथे चल राणी
 • पंख
 • पोरका
 • मी... माझ्याशी
 • रमाई

वसंत कानेटकरांच्या नाट्यलेखनापूर्वीच्या प्रसिद्ध कथा (या दोन कथांच्या मिश्रणातून 'वेड्याचे घर उन्हात' हे नाटक सिद्ध झाले).[संपादन]

 • औरंगजेब
 • वेड्याचे घर उन्हात !

कथासंग्रह[संपादन]

 • हे हृदय कसे आईचे
 • लावण्यमयी

समीक्षाग्रंथ[संपादन]

 • कवी आणि कवित्व
 • नाटक : एक चिंतन

आत्मकथा[संपादन]

 • आत्मचिंतन
 • मी ... माझ्याशी (आठवणी)

एकांकिका[संपादन]

 • आनंदीबाई आणीबाणी पुकारतात
 • एकांकिकासंग्रह (तीन विनोदी एकांकिका). 'तीन एकांकिका' नावाची अाणखी दोन पुस्तके आहेत. लेखक - मो.ग. चव्हाण, दीपक कांबळी. त्यांशिवाय उमेशचंद्र बेलारे, द.मा. मिरासदार, विवेक गरुड, सी.म. चितळे यांचेही एकांकिकासंग्रह आहेत.
 • गड गेला पण सिंह जागा झाला
 • झेंडे पाटील महाविद्यालयात गंगू, अंबू, विठा
 • मद्रासीने केला मराठी भ्रतार
 • व्यासांचा कायाकल्प
 • शहाण्याला मार शब्दांचा
 • स्मगलर-सम्राटांच्या न्यायालयात रामशास्त्री

वसंतराव कानेटकर यांच्या वाङ्मयावरील समीक्षाग्रंथ[संपादन]

 • नाटककार - वसंत कानेटकर (चरित्र, शशिकांत श्रीखंडे)
 • मराठी नाटक आणि वसंत कानेटकर (डाॅ राजश्री कुलकर्णी-देशपांडे)
 • प्रा .वसंत कानेटकरांची ऐतिहासिक व पौराणिक नाटके (पंडितराव एस. पवार)
 • वसंत कानेटकरांची नाटके : वैविध्य आणि ध्रुवीकरण (रा. भा. पाटणकर)

गौरव[संपादन]

वसंत कानेटकर यांच्या नावाने रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे वसंत कानेटकर स्मृति पुरस्कार दिला जातो.

पुरस्कार[संपादन]


 1. ^ "कानेटकर, वसंत – profiles" (इंग्रजी भाषेत). 2019-01-04 रोजी पाहिले.