गोंड राजाचा किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
किल्ला
नाव {{{गोंड राजाचा किल्ला}}}
उंची {{{उंची}}}
प्रकार {{{प्रकार}}}
चढाईची श्रेणी {{{श्रेणी}}}
ठिकाण {{{महाल,नागपूर}}}
जवळचे गाव {{{नागपूर}}}
डोंगररांग {{{डोंगररांग}}}
सध्याची अवस्था {{{भग्न}}}


भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर शहराच्या ’महाल’ या भागात असलेला हा किल्ला आहे. या किल्ल्याचे बांधकाम मजबुत होते. यासभोवताल पाण्याने भरलेले खंदक खोदण्यात आले होते. या किल्ल्यास उत्तरेच्या बाजुस एक दगडी कमान आहे. ते प्रवेशद्वार.या प्रवेशद्वारावर फारसी लिपीत कोरलेले आढळून येते.या द्वारातुन सुमारे ७० मीटर आत गेल्यावर एक लाकडाचे भव्य द्वार आहे. या लाकडाच्या द्वाराची जाडी सुमारे ७-८ सें.मी. असावी. हा जुना राजवाडा आहे. सध्या भग्नावस्थेत आहे.येथे लाकडी स्तंभांचे बांधकाम करण्यात आलेले होते. त्यावर गच्ची होती. हा किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे ७०० मीटर लांब आणि ५०० मीटर रुंद येवढे असावे. या राजवाड्याचे आत संगमरवरी बांधकामाचा एक फवारा आहे.तेथील गोंड राजाच्या वंशजांनी त्या राजाच्या वस्तु अधापही सांभाळुन ठेविल्या आहे.

या किल्ल्याच्या सभोवताल बुरुज होते. त्यापैकी फक्त एकच बुरुज अस्तित्वात आहे.या बुरुजावर एक तोफ आहे.या तोफेवर मनुष्याची आकृती आहे. ती एका ओट्यावर ठेवलेली आहे. ती गोल फिरविता येण्याची व्यवस्था आहे. बादशहा शहाजहानने इ.स.१६३७ साली सुरुंग लावून तीन बुरुज उडविले.याचे कारण गोंड राजाने त्यास खंडणी दिली नव्हती.सन १७३२ साली हा प्रथम रघुजी भोसलेंनी आपल्या ताब्यात घेतला असे इतिहासकार सांगतात.