१९२७ च्या नागपूर दंगली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
1927 च्या नागपुर दंगली 
1927 साली झालेल्या हिंदू मुस्लिम दंगली
माध्यमे अपभारण करा
प्रकार दंगल,
communal violence
स्थाननागपूर, नागपूर जिल्हा, नागपूर विभाग, महाराष्ट्र, भारत
कालबिंदू सप्टेंबर ४, इ.स. १९२७
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg
1927 Nagpur riots (en); 1927 च्या नागपुर दंगली (mr); 1927 Nagpur riots (en-ca); 1927 Nagpur riots (en-gb) 1927 साली झालेल्या हिंदू मुस्लिम दंगली (mr)

१९२७ च्या नागपूर दंगली तत्कालीन ब्रिटीश भारतात चालू असलेल्या दंगलींच्या मालिकेचा एक भाग होती. त्यावेळी नागपूर हे सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि बेरार या प्रांताची राजधानी होते. ह्या दंगली ४ सप्टेंबर१९२७ रोजी झाल्या.[१]  त्या दिवशी महालक्ष्मीची मिरवणूक काढण्यात् आली होती, त्या मिरवणूकीला मुस्लिम आडवे गेल्याचे सांगितले गेले, त्यानंतर आसपासच्या हिंदू वस्तीभोवती पुढचे तीन दिवस दंगल होत राहिली.[२]

पार्श्वभूमी[संपादन]

१९२०च्या सुमारास हिंदू-मुस्लिम समाजामधील तेढ वाढत चालली होते. १९२०-२३ नंतर भारतातील अनेक शहरांमध्ये सांप्रदायिक दंगली आणि नंतर तणावाचे वातावरण निर्माण होत होते. १९२३ साली अकरा, १९२४ साली अठरा,१९२५ साली सोळा तर १९२६ साली पस्तीस हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या आहेत. ऑगस्ट १९२७ च्या बंगाल, पंजाब, उ.प्रदेश आणि लाहोरच्या दंगली सर्वात जास्त हिंसक होत्या.

हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी १९२३ साली काढलेल्या मिरवणूकीचे मशिदीच्या समोरून नेले जाणे आणि मिरवणूकीमध्ये मोठ्या आवाजात वाद्य वाजविले जाणे हे त्यावेळच्या दंगलीचे मुख्य कारण बनले.  ह्या दंगलींचा हेडगेवारांवर मोठा परिणाम झाला आणि त्यातूनच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १९२५ ला स्थापना केली. [३]  ह्या दंगलीला उत्तर आणि पूर्वीची मशिदीसमोरुन शांततेत मिरवणूका नेण्याचा संकेत मोडण्यासाठी १९२७ च्या गणेश मिरवणूकीमध्ये हेडगेवारांनी मुद्दाम मोठ्याने ढोल वाजवत, मिरवणूक मशिदी समोरून नेली [४] ह्या सर्वाचा परिपाक म्हणून सांप्रदायिक ध्रुवीकरणास सुरूवात झाली.

दंगल[संपादन]

४ सप्टेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने हिंदूंनी सालाबादप्रमाणे मिरवणूक काढली होती, ती मिरवणूक ज्यावेळी महाल इलाक्यातील मशिदीसमोर पोहोचली त्यावेळी स्थानिक मुस्लिमांनी ती मिरवणूक तेथुन पुढे नेण्यास मज्जाव केला. मिरवणूकीच्या दिवशीच दुपारच्या वेळी जेव्हा हिंदू लोक आपल्या घरांमध्ये आराम करत होते तेव्हा अनेक मुस्लिम तरुण अल्लाहू अकबरच्या आरोळ्या ठोकत सुरे, चाकू घेऊन झुंडीने हिंदू इलाक्यात दाखल झाले.

हेडगेवार यांच्या घरावर मुस्लिम युवकांनी दगडफेक केली, त्यावेळी हेडगेवार नागपूरात आपल्या घरी नव्हते.[५]  रा.स्व.संघाचे कार्यकर्ते ह्या समस्येला तोंड देण्यासाठी लाठ्या घेऊन महाल इलाक्याच्या गल्ल्यांमध्ये आले, ज्यामुळे वातावरण आणिखनच चिघळले.  लियाकत अली खान आपल्या पुस्तकात म्हणतात की, अशा हिंसक दंगलीमध्ये वापरली गेलेली हत्यारे आणि दारुगोळा अचानक येत नाही तो आधीच पूर्वनियजनाचा भाग म्हणून गोळा करुन ठेवलेला असतो.

वॉशिंगटन पोस्टच्या बातमीनूसार या दोन दिवसाच्या दंगलीमध्ये एकूण २२ जणांनी [६]आपले प्राण गमावले आणि जवळपास १०० जणांना गंभीर जखमा झाल्या होत्या.

दोन दिवसानंतर सरकारने शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्याला पाचारण केले.[७] ह्या दंगलीच्या निमित्ताने रा.स्व.संघाच्या एकूण १६ शाखांनी शहरभर आपल्या ़'स्वयंसेवकांची फौज' हिंदूंच्या 'रक्षणासाठी' खडी केली होती.[८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Khan, Liaquat Ali (2007). Pakistan — The Heart of Asia. READ BOOKS. pp. 157–159. आय.एस.बी.एन. 978-1-4067-4352-4. 
  2. ^ Chitkara, M. G. (2004). Rashtriya Swayamsevak Sangh. APH Publishing. pp. 249–250. आय.एस.बी.एन. 978-81-7648-465-7. 
  3. ^ Ahmad, Aijaz (2002). Lineages of the Present. Verso. पान क्रमांक 291. आय.एस.बी.एन. 978-1-85984-765-7. 
  4. ^ Jaffrelot, Christophe (1996). The Hindu Nationalist Movement and Indian Politics. C. Hurst & Co. Publishers. पान क्रमांक 40. आय.एस.बी.एन. 978-1-85065-301-1. 
  5. ^ Jaffrelot, Christophe (1999). The Hindu Nationalist Movement and Indian Politics: 1925 to the 1990s : Strategies of Identity-building, Implantation and Mobilisation (with Special Reference to Central India) (इंग्रजी मजकूर). Penguin Books India. आय.एस.बी.एन. 978-0-14-024602-5. 
  6. ^ Basu, Tapan (1993). Khaki Shorts and Saffron Flags: A Critique of the Hindu Right (en मजकूर). Orient Blackswan. pp. 19–20. आय.एस.बी.एन. 978-0-86311-383-3. 
  7. ^ "25 DEAD, 180 INJURED IN CREED RIOTS IN INDIA; Troops Are Called to Quell TwoDay Hindu-Moslem Fight at Nagpur.". New York Times. 8 September 1927. 2009-01-10 रोजी पाहिले. 
  8. ^ Marty, Martin E.; Appleby, F. Scott; Appleby, R. Scott (1991). Fundamentalisms and the State. American Academy of Arts and Sciences. University of Chicago Press. पान क्रमांक 241. आय.एस.बी.एन. 978-0-226-50884-9.