मिहान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मल्टिमोडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट अ‍ॅट नागपूर, अर्थात मिहान (इंग्लिश: Multi-modal International Cargo Hub and Airport at Nagpur, रोमन लिपीतील लघुरूप: MIHAN) हा महाराष्ट्रातील नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचा विमानतळ-प्रकल्प आहे. नागपुराच्या भारतातील मध्यवर्ती स्थानाचा उपयोग करून, रस्ते व रेल्वे वाहतुकीचे जाळे जोडून सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठ्या मालवाहतूक व प्रवासी वाहतूक केंद्रामध्ये रूपांतर करणे, हे मिहान प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. भारतात चालू असलेल्या आर्थिक विकासप्रकल्पांमधल्या चालू प्रकल्पांमध्ये हा सर्वाधिक गुंतवणुकीचा प्रकल्प आहे[१]. मिहान प्रकल्प आग्नेय आशियाकडीलपश्चिम आशियाकडील मालवाहतुकीसाठी महत्त्वाचा थांबा बनणार आहे. विमानउत्पादक कंपन्यांमधील अग्रगण्य अश्या बोइंग कंपनीची १८.५ कोटी अमेरिकी डॉलर गुंतवणूक या प्रकल्पासाठी प्रस्तावित आहे[ संदर्भ हवा ].

नागपूरचे भौगोलिक स्थान बघता मुंबईऐवजी विमानांना इंधन भरण्यासाठी नागपूरला विकसित करण्याची कल्पना होती. पुढे विमानांची देखभाल-दुरुस्ती करण्याबाबत विचार होऊ लागला. त्यानंतर मालवाहतूक केंद्र, अर्थात कार्गो हब, विकसवण्याचा आराखडा तयार करण्यात आला. मालवाहतूक केंद्राची उपयुक्ततता वाढावी, म्हणून आता विशेष आर्थिक क्षेत्र आणण्यात आले[ संदर्भ हवा ].

प्रकल्प व्यवस्थापन[संपादन]

फेब्रुवारी, इ.स. २००६ मध्ये भारतीय केंद्रशासन आणि महाराष्ट्र शासन यांच्यादरम्यान नागपूर विमानतळ हस्तांतरित करण्याचा करार करण्यात आला होता. नागपूरच्या मिहान प्रकल्पाचे व्यवस्थापण सांभाळण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनी एकत्र येऊन २२ फेब्रुवारी, इ.स. २००९ रोजी मिहान इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची संयुक्त कंपनी स्थापली आहे. ९ जून, इ.स. २००९ रोजी नागपुरात कंपनीची नोंदणी करण्यात आली होती. या कंपनीत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ५१ %, तर भारतीय विमानतळ प्राधिकरणाची ४९ % भागी राहणार आहे.

प्रकल्प तपशील[संपादन]

thumb|right|250px|मिहान प्रकल्पाच्या प्रस्तावित बांधकामाचे संगणकीय कल्पनाचित्र

एअर इंडिया-बोइंग एमआरओ[संपादन]

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून खरीदलेल्या ५० एकर जागेवरील एअर इंडिया-बोइंग एमआरओचे बांधकाम डिसेंबर, इ.स. २०१२ पर्यंत पुरे होणे अपेक्षित आहे. जुलै, इ.स. २०१३पासून बोइंगच्या हँगरांत देखभाल व दुरुस्तीसाठी विमाने येण्यास आरंभ होईल. एमआरओचे काम हे एअर इंडियाच्या सहकार्याने होत असल्यामुळे या ठिकाणी सर्वप्रथम एअर इंडियाच्या विमानांना प्राधान्य राहील. या एमआरओमध्ये १०,००० चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन हँगर व २,००० चौरस मीटर क्षेत्रफळाचा एक हँगर बांधले जाणार आहेत[ संदर्भ हवा ].

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "मिहान इज बिगेस्ट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट (मिहान सर्वांत मोठा विकासप्रकल्प आहे)" (इंग्लिश मजकूर). टाइम्स ऑफ इंडिया. २२ मे, इ.स. २००७. २४ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]

Broom icon.svg
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.