Jump to content

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून



राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
ब्रीदवाक्य विद्या परंदैवतम्
Campus शहरी, ३२७ एकर



राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (पूर्वीचे नागपूर विद्यापीठ) महाराष्ट्रातील नागपूर शहरात आहे. ही एक मध्य भारतातील प्रमुख शिक्षण संस्था आहे. नागपूर जिल्ह्यातील (तसेच नागपूर शहरातील) सर्व महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत.

इतिहास

[संपादन]

नागपूर विद्यापीठाची स्थापना ४ ऑगस्ट १९२३ रोजी झाली. सर फ्रॅक स्लाय हे त्या वेळेचे कुलपती होते. या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू सर बिपिनकृष्ण बोस हे होते. त्या वेळेस फक्त ६ महाविद्यालये, ९१७ विद्यार्थी, व फक्त ४ विद्याशाखा या पुंजीवर हे विद्यापीठ सुरू झाले. एका मोठ्या कालावधीनंतर २००५ साली विद्यापीठाचे नाव बदलण्यात आले.

वैशिष्ट्ये

[संपादन]
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारलेला अभ्यासक्रम सुरू करणारे हे पहिले विद्यापीठ आहे.
  • एका स्वतंत्र विभागाद्वारे महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारलेला अभासक्रम सुरू करण्याचे श्रेयही या विद्यापीठास जाते.

बाह्य दुवे

[संपादन]

Nagpuruniversity.org