Jump to content

वडोदरा विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वडोदरा विमानतळ
हरणी विमानतळ
आहसंवि: BDQआप्रविको: VABO
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा वडोदरा
समुद्रसपाटीपासून उंची १२७ फू / ३८.७ मी
गुणक (भौगोलिक) 22°19′46″N 73°13′10″E / 22.32944°N 73.21944°E / 22.32944; 73.21944
संकेतस्थळ Vadodara Airport विमानतळाचे संकेतस्थळ
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०४/२२ ८,१०० २,४६९ डांबरी धावपट्टी

वडोदरा विमानतळ (आहसंवि: BDQआप्रविको: VABO) गुजरातच्या वडोदरा शहरातील विमानतळ आहे. याला हरणी विमानतळ असेही नाव आहे.

वडोदरा वायुसेना तळ या विमानतळाशी संलग्न आहे. काही वर्षांत या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा बेत आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया स्थानिक दिल्ली
इंडिगो बंगळूर,चेन्नई, दिल्ली, कोलकाता,मुंबई
जेट एरवेझ दिल्ली,मुंबई

टर्मिनल्स

[संपादन]

सध्याचे टर्मिनल अगदी छोटे आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवीन टर्मिनलची पायाभरणी फेब्रुवारी २६, इ.स. २००९ रोजी करण्यात आली. याची रचना करण्यासाठी स्पर्धेतून पात्र ठरलेल्या जेन्सलर, फ्रेडरिक श्वार्त्झ आणि क्रियेटिव्ह ग्रुप या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.[][] २०१० च्या अखेरपर्यंत तयार होणाऱ्या या टर्मिनलची क्षमता ताशी ७०० (५०० अंतर्देशीय तर २०० आंतरराष्ट्रीय) प्रवासी हाताळण्याची असेल. याचा व्याप १८,१२० चौ.मी. व्याप असून तेथे १८ चेक-इन अधिकाऱ्यांची व्यवस्था असेल.

सध्या या विमानतळावरून मालसामानाची वाहतूक होत नाही.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Foundation Stone for New Integrated Terminal Laid at Vadodara - PIB Press Release
  2. ^ "Vadodara Airport new terminal design - Frederic Schwartz Architects". 2016-04-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-14 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]

गुणक: 22°19′45″N 73°12′58″E / 22.3293°N 73.2161°E / 22.3293; 73.2161