शारजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शारजा
الشارقة‎
संयुक्त अरब अमिरातीमधील शहर
Flag of Sharjah.svg
ध्वज
Map of Sharjah blank.svg
शारजाचे संयुक्त अरब अमिरातीमधील स्थान
शारजा is located in संयुक्त अरब अमिराती
शारजा
शारजा
शारजाचे संयुक्त अरब अमिरातीमधील स्थान

गुणक: 25°21′27″N 55°23′27″E / 25.35750°N 55.39083°E / 25.35750; 55.39083

देश संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
प्रांत शारजा अमिरात
स्थापना वर्ष ९ जून १८३३
क्षेत्रफळ २३५.५ चौ. किमी (९०.९ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ८,०१,००४
प्रमाणवेळ यूटीसी+०४:००
http://www.dm.gov.ae


शारजा (अरबी: الشارقة‎) हे पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती ह्या देशामधील तिसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर (दुबईअबु धाबीखालोखाल) व शारजा अमिरातीचे राजधानीचे शहर आहे.[१] शारजा शहर शारजा अमिरातीच्या उत्तर भागात पर्शियन आखाताच्या दक्षिण किनाऱ्यावर वसले आहे. दुबई-अजमान-शारजा ह्या महानगरामधील एक मोठे शहर असलेल्या शारजाची लोकसंख्या २००८ साली सुमारे ८ लाख होती.

शारजा हे एक अमिरातीमधील एक सुबत्त शहर असून त्याला अनेक शतकांचा इतिहास लाभला आहे. सध्या शारजा शहर देशाच्या एकूण जी.डी.पी.च्या ७.४ टक्के वाट्यासाठी कारणीभूत आहे. येथील शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील आघाडीच्या व वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे. २००८ सालच्या जागतिक मंदीचा फटका शारजाच्या स्थावर उद्योगाला देखील बसला परंतु त्यामधून शारजा बाहेर येत आहे.[२]

वाहतूक[संपादन]

शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अमिरातीमधील वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असून एअर अरेबिया ह्या विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे.

खेळ[संपादन]

क्रिकेट हा शारजामधील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहेत. येथील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम १९८० व ९० च्या दशकात एक लोकप्रिय क्रिकेट मैदान होते. सध्या अफगाणिस्तान क्रिकेट संघ आपले सामने शारजामधून खेळतो. २०१४ इंडियन प्रीमियर लीगमधील सुरूवातीचे अनेक सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात आले होते ज्यांपैकी काही शारजामध्ये देखील आयोजीत करण्यात आले होते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "United Arab Emirates: metropolitan areas". 31 July 2009 रोजी पाहिले.
  2. ^ "Dubai witnessed stable financial recovery - report". 2012-06-28. 2013-03-12 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत