Jump to content

भौगोलिक गुणक पद्धती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पृथ्वीच्या नकाशावर अक्षांश व रेखांश

भू-गोलावरील स्थाननिर्देशक पद्धती ही एखादे ठिकाण पृथ्वीवर नेमके कोठे आहे ते सांगण्यासाठी वापरण्यात येते.

अक्षांश - रेखांश[संपादन]

अक्षांश (Lattitude) हा आकडा पृथ्वीवरील एखाद्या स्थळाचे विषुववृत्तापासूनचे अंशांतर सांगतो. हे अंशांतले अंतर सांगण्यासाठी विषुववृत्ताचा अक्षांश ० अंश (°), उत्तर ध्रुवाचा अक्षांश ९०° उत्तर , तर दक्षिण ध्रुवाचा अक्षांश ९०° दक्षिण (S) मानला गेला आहे. ह्याचा अर्थ असा की, पृथ्वीवरील सर्व स्थळे ९०° उत्तर व ९०° दक्षिण ह्या अक्षांशांच्या दरम्यान आहेत. अंशांचे विभाजन मिनिटे व सेकंदांमध्ये करण्यात येते. १ अंश = ६० मिनिट; १ मिनिट = ६० सेकंद. अंशाचा आकड्यावर ही खूण, मिनिटाच्या आकड्यावर ' ही, तर सेकंद दाखवणाऱ्या आकड्यावर " असे चिन्ह असते.

रेखांश (Longitude) हा आकडा स्थळाचे पृथ्वीवरील शून्य रेखावृत्तापासून पूर्व-पश्चिम अंशांतर सागतो. लंडन शहराजवळील ग्रीनविच ह्या ठिकाणावरून उत्तर-दक्षिण ध्रुवबिंदूंना जोडणाऱ्या आणि पृथ्वीच्या गोलावरून काढलेल्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषेला ०° रेखावृत्त म्हणतात. त्यामुळे ग्रीनविचचे रेखांश शून्य अंश. त्याच्या पूर्वेकडील स्थळे ० ते १८०° पूर्व तर पश्चिमेकडील स्थळे ० ते १८०° पश्चिम रेखांशांवर आहेत, असे मानले गेले आहे. १८० पूर्व आणि १८० पश्चिम ही वेगळी रेखावृत्ते नसून ती एकच रेषा आहे.

अक्षांश व रेखांश वापरून पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित करता येते, परंतु त्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची वा खोली ठरवता येत नाही.

उदाहरणे[संपादन]