पाकयाँग विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाकयॉंग विमानतळ हा भारताच्या सिक्कीम राज्यात असलेला एक विमानतळ आहे. याला सिक्कीम विमानतळ असेही म्हणता येते. या विमानतळाला हवाईसेवा सुरू करण्यास दि. २६-०८-२०१८ला परवानगी देण्यात आली. यामुळे सिक्कीम भारताच्या इतर राज्यांशी वायुमार्गाने जोडले गेले.

अतिशय खडकाळ प्रदेशात समुद्रसपाटीपासून सुमारे ४,५०० फुटावर या विमानतळाचे बांधकाम करण्यात आले आहे. हा विमानतळ भारतातील १००वा विमानतळ असून सर्वात उंच जागी असलेल्या पाच विमानतळांपैकी एक आहे.

यापूर्वी सिक्कीमला जाण्यास थेट विमानसेवा उपलब्ध नव्हती. गंगटोक या सिक्कीममधील गावापासून सुमारे १२५ किमी अंतर असलेल्या बागडोग्रा येथे ती उपलब्ध आहे. नंतरचा प्रवास रस्ते मार्गाने करावा लागत होता.

सध्या स्पाईसजेट या हवाई सेवा पुरविण्यात येणाऱ्या कंपनीतर्फे कोलकाता ते पाकयॉंग अशी सेवा सुरू करण्यात येत आहे.

वैशिष्ट्ये[संपादन]

  • देशाच्या ईशान्य भागात बांधण्यात आलेले हे पहिलेच ग्रीनफिल्ड[मराठी शब्द सुचवा] विमानतळ आहे
  • हा विमानतळ सुमारे १९० एकर इतक्या जागेवर पसरलेले आहे.
  • बांधकामासाठी सुमारे रु. ३५१ कोटी रुपये खर्च आला.
  • सिक्कीमची राजधानी गंगटोक पासून केवळ ३० किमी अंतरावर
  • हिमालय पर्वताच्या मधल्याकोणत्या? रांगांमध्ये हे स्थित आहे.
  • भारतीय हवाई दलास चीनच्या आक्रमणापासून प्रतिकार करण्यास उपयुक्त. चीनच्या सीमेपासून केवळ ६० किमी अंतरावर आहे.