मारबत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. पुर्वी, बांकाबाई हिने ईंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणुन बांकाबाईच्या, कागदबांबू वापरून केलेल्या पुतळयाची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस)मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते.या मध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत.बाकांबाईच्या नवऱ्यानेपण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणुन त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणुक काढतात. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला 'बडग्या' म्हणतात.या दिवशी(श्रावण अमावस्येच्या दुसऱ्यादिवशी)नागपूर व जवळपासच्या गाव-खेडयातील लोकं नागपूरला आपल्या लहानग्यांना घेउन येतात.मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात.ही एक प्रकारे जत्राच आहे. तेथे अनेक फेरीवाले फुगे,खेळणी इ.वस्तु विकतात.या वेळेस पावसाळयाच्या जोर कमी झाला असतो.शेतीची कामेपण बहुदा झालेली असतात.त्यामुळे शेतकऱ्यांना व इतरेजनांना हा एक विरंगुळा वाटतो.
ईंग्रजांचे राज्य जाऊन आज कितीतरी वर्षे लोटली. परंतु, नागपूरकर आणि या परीसरातील नागरिकांच्या मनात बांकाबाईच्या कुकृत्यामुळे झालेली जखम अजुन भळभळतेच आहे.

सन २०११ मध्ये काळ्या मारबतीच्या मिरवणुकीला १३१ वर्षे तर पिवळ्या मारबतीला १२७ वर्षे पूर्ण झाली आहेत.[१]

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत आणि बडग्याचा उत्सव असतो. या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. या उत्‍सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्‍या विरोधात राग आणि संताप व्यक्त होतो. दरवर्षी वर्षभरातील चर्चेचा विषय घेऊन बडग्या येत असतो.

कसे तयार होतात मारबत?[२]

ही परंपरा मूळ आदिवासींची आहे, जी नागपुरात १८८१ सालापासून सुरू झाली. तेली समाजाच्या बांधवांनी पिवळी मारबत तयार करून तिचे दहन करण्याची प्रथा सुरू केली. तान्ह्या पोळ्याच्या दिवशी लहान मुले गल्लीबोळांतून “घेऊन जा रे मारबत ,घेऊन जा रे मारबत” असे ओरडत फिरत असतात. काठ्या, बांबू, तरट ह्यापासून मोठे पुतळे बनवले जातात, त्यावर फाटके कपडे, चिंध्या गुंडाळतात व विविध रंगांनी रंगवतात. मारबतबरोबर जो बडग्या असतो त्याच्या गळ्यात मोडके झाडू, फाटके कपडे, फुटके डबे, टायरचे तुकडे ह्यांच्या माळा घालतात. बडग्याच्या हातात मुसळ व कमरेला उखळ बांधलेले असते.


चित्र[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ दैनिक लोकमत, नागपूर[permanent dead link]
  2. ^ "नागपूरचा मारबत उत्सव". महाराष्ट्र न्यूझ. 31 August 2019. Archived from the original on 2019-08-31. 31 August 2019 रोजी पाहिले.