बख्तबुलंद शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बख्तबुलंद शाह याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली.

इतिहास[संपादन]

या राजाचे मूळ नाव 'महिपत शाह' असे होते.छिंदवाड्याजवळ असलेल्या देवगड या ठिकाणचा हा मूळ गोंड राजा होता.ते गाव दुर्गम असल्याने व नागपूरक्षेत्र हे पठारी असल्याने त्याने आपली राजधानी नागपूर येथे हलविली.नागपूरच्या परिसरातील राजापूर,रायपूर,हिवरी,हरीपूर,वाठोडा,सक्करदरा,आकरी,लेंढरा,फुटाळा,गाडगा,भानखेडा व सिताबर्डी अशी या बारा गावांची नावे होती.या गावांना 'राजापूर बारसा' (राजापूरसह बारा गावे) असे संबोधिल्या जायचे.या गावांना रस्त्यांनी जोड्ण्याचे काम या राजाने केले.

या राजास भाउबंदकी भोवली.औरंगजेब याने त्यास मदत केली व या मोक्याचा फायदा उठवुन या राजास मुसलमान धर्म स्वीकारणे भाग पाडले..'बख्तबुलंद' म्हणजे नशीबवान. हे नाव त्यास औरंगजेबाने दिले.

हा राजा पराक्रमी होता. त्याने नागपूर राज्याच्या सीमा शिवनी,पवनी, कटंगी, भंडारा आदि गावांकडे विस्तारल्या.नागपूरचा किल्ला हा त्यानेच बांधलेला किल्ला आहे.

नागपूर येथे विधान भवनाजवळ या राजाचा पुतळा आहे.[१][ चित्र हवे ]

संदर्भ[संपादन]

  1. [१] पुतळ्याचे छायाचित्र