फुटाळा तलाव, नागपूर
Jump to navigation
Jump to search
फुटाळा तलाव हा नागपूरच्या पश्चिम भागात असणारा एक तलाव आहे.[ चित्र हवे ]यास तेलंगखेडी तलाव असेही म्हणतात.याची बांधणी भोसले राजवटीदरम्यानच झाली.या शेजारीच तेलंगखेडी बगिचा आहे.भोसले येथे या बगिच्यात उन्हाळ्यात येते असत अशी आख्यायिका आहे.याचे पाणी अडविण्यासाठी घातलेला बांध हा पूर्व दिशेस असून त्यावर रस्ता आहे. येथे चौपाटीसदृष्य व्यवस्था करण्यात आलेली आहे.तेथे अनेक दुकानेही आहेत.या तलावाचे बांधाचे दिशेस दगडांची पाळ बांधण्यात आलेली आहे.येथे अनेक व्यक्ति मासेमारीही करतात.
नागपूर शहरातील अनेक मोठ्या गणपतींच्या मातीच्या मूर्तींचे व देवींच्या मातीच्या मूर्तींचे येथे विसर्जन करण्यात येते.याचे वायव्य दिशेस सातपुडा उद्यान व सेमिनरी हिल्स आहे.