तान्हा पोळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तान्ह्या पोळ्याचा विक्रीस आलेला रु.५१,००० चा लाकडी बैल

तान्हा पोळा[संपादन]

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. महाराष्ट्रात व त्यातल्यात्यात विदर्भात, पोळा हा एक शेतकऱ्यांचा मोठा सण आहे. त्या दिवशी बैलांना कामकाजापासून सुट्टी असते. त्या दिवशी बैलांना न्हाऊ-माखू घालतात. त्यांना गोड पुरणपोळीचे जेवण घालतात, त्यांना सजवतात व मिरवतात. त्या दिवशी त्यांची घरोघरी पूजा होते.
लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाहीत. ते त्यांना आवरूपण शकत नाहीत. म्हणून त्यांच्या हौस-मजेसाठी तान्हा पोळा' साजरा करण्यात येतो. त्या दिवशी, लहान मुले लाकडापासून तयार केलेला बैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच या लाकडाच्या बैलाचा तान्हा पोळा साजरा करतात. नागपूरकर भोसल्यांच्या शासनकाळात हा सण सुरू झाला. [१] विदर्भात बहुधा सर्व ठिकाणी हा सण साजरा होतो.

संदर्भ[संपादन]