जयप्रकाश नारायण विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लोकनायक जयप्रकाश विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
लोकनायक जयप्रकाश विमानतळ
आहसंवि: PATआप्रविको: VEPT
PAT is located in बिहार
PAT
PAT
बिहारमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
मालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा बिहार राज्यातील पटना शहरास
समुद्रसपाटीपासून उंची १७० फू / ५२ मी
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
०७/२५ १,९५४ डांबर
सांख्यिकी (एप्रिल 2013 - मार्च 2014)
प्रवासी १०,४४,१२७
उड्डाणे ९,८८६

लोकनायक जयप्रकाश विमानतळ किंवा जयप्रकाश नारायण विमानतळ (आहसंवि: PATआप्रविको: VEPT) हा भारत देशाच्या बिहार राज्याच्या पाटणा शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मार्च २०१४ मध्ये प्रवाशांच्या संख्येबाबतीत हा विमानतळ बिहारमधील सर्वात वर्दळीचा तर भारतामध्ये २१व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ होता.

स्वातंत्र्यसैनिक जयप्रकाश नारायण यांचे नाव दिला गेलेला हा विमानतळ पाटणा शहराच्या नैर्ऋत्येस ४ किमी अंतरावर आहे.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया दिल्ली, कोलकाता, मुंबई
गोएर बंगळूर, दिल्ली, कोलकाता, मुंबई
इंडिगो बंगळूर, दिल्ली, कोलकाता, लखनौ, मुंबई
जेट एरवेझ दिल्ली, इंदूर, कोलकाता, लखनौ
जेटकनेक्ट बंगळूर, दिल्ली, कोलकाता

बाह्य दुवे[संपादन]