शुक्रवार तलाव (नागपूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शुक्रवार तलाव, नागपूर या पानावरून पुनर्निर्देशित)

शुक्रवार तलाव हा नागपूर शहराच्या मध्यभागात असणारा एक तलाव आहे.[ चित्र हवे ] यास "गांधीसागर" असेही म्हणतात. कोणी यास 'जुम्मा तलाव' म्हणतात. नागपूरच्या अनेक तलावांसारखा हाही भोसले राजवटीदरम्यानच बांधला गेला. यास चहूबाजूंनी दगडी बांधकाम केले आहे. तलावाच्या उत्तरेला एक बेट आहे. बेटावर अनेक झाडे आहेत. स्थानिक महानगरपालिकेतर्फे या तलावाचे पूर्वी सौंदर्यीकरण करण्यात आले होते. पण सध्या तलावाची अवस्था ठीक नाही.[ संदर्भ हवा ] तलावाच्या पश्चिमेस रमण विज्ञान केंद्र आहे.

तलावाच्या चारी बाजूंनी रस्ते आहेत. पूर्वी टाटा समूहाच्या मॉडेल मिल व एम्प्रेस मिल या कापड गिरण्या या तलावाचे पाणी वापरत असत. तलावामुळे जुन्या शहरातील विहिरींच्या पाण्याचा स्तर वाढण्यास मदत होत असे.

भोसल्यांच्या राजवटीदरम्यान, जुन्या नागपूर शहरास एक परकोट होता. त्या परकोटाशेजारी एक खंदक होता. त्या खंदकात या तलावातून पाणी सोडले जात होते.[ संदर्भ हवा ]