Jump to content

छत्तीसगढ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?छत्तीसगढ

भारत
—  राज्य  —
Map

२१° १६′ १२″ N, ८१° ३६′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,३५,१९४ चौ. किमी
राजधानी रायपूर
मोठे शहर रायपूर
जिल्हे १८
लोकसंख्या
घनता
२,०७,९५,९५६ (१७ वा) (२००१)
• १०८/किमी
भाषा छत्तीसगढी, हिंदी
राज्यपाल आनंदीबेन पटेल
मुख्यमंत्री विष्णुदेव साई
स्थापित १ नोव्हेंबर २०००
विधानसभा (जागा) Unicameral (९०)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-CT
संकेतस्थळ: छत्तीसगढ सरकार संकेतस्थळ

इतिहास

[संपादन]

छत्तीसगढ हे नाव १५ व्या शतकात परिसरातील ३६ गडांवरून पडले असावे असा अंदाज आहे. यापैकी रायपूर आणि रतनपूर क्षेत्रात प्रत्येकी १८ गड आहेत. या काळाच्या आधी या भागास दंडकारण्य-दक्षिणकोशल या नावाने ओळखले जात होते. प्रसिद्ध ऐतिहासिक ग्रंथ रामायणनुसार, भगवान श्रीरामांनी आपला वनवासाचा काळ याच भागात घालवला. अशा रीतीने त्याकाळी दंडकारण्य म्हणून ओळखले जाणारे हे क्षेत्र श्रीरामाची कार्यभूमी होती. इ.स.पूर्व ७२ ते २०० इ.स.पर्यंत सातवाहन राजांनी राज्य केले. इसवी सन पूर्व ६०० ते १३२४ पर्यंत या भागात नल आणि नाग या भागात आदिवासी हिंदू राजांचे गोंड संस्कृती असलेले राज्य होते.[] स्वातंत्र्यपूर्व काळात छत्तीसगढ राज्य मध्य प्रांताचा भाग होते. छत्तीसगड वर काही काळ मराठा साम्राज्याचे नियंत्रण होते. येथे बस्तर, कांकेर, नांदगाव, खैरागढ, छुईखदान, कावर्धा, रायगढ, सक्ती, सारंगगढ, सुरगुजा, जशपूर, कोरिया, चांगभरवार आणि उदयपूर संस्थान ही १४ छोटी हिंदू संस्थाने होती. तर रायपूर, बिलासपूर, दुर्ग ही खालसा राज्ये होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली छत्तीसगढचा समावेष मध्य भारतात करण्यात आला. १९५० साली मध्य भारतचे नाव बदलून ते मध्य प्रदेश करण्यात आले. १ नोव्हेंबर १९५६ला एकदा आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर एकदा मध्य प्रदेश राज्याची नवी रचना करण्यात आली. या प्रत्येक वेळी छत्तीसगढ राज्य मध्य प्रदेशचाच भाग होते. १ नोव्हेंबर २०००ला छत्तीसगढ नावाच्या नव्या, २६ व्या, राज्याची रचना करण्यात आली.

भारताच्या छत्तीसगढ राज्याचे स्थान

प्रदेशाचे धार्मिक महत्त्व

[संपादन]

दंतेवाडातील ढोलकल गणेशाची ही अनोखी मूर्ती छत्तीसगडच्या दंतेवाडा येथील ढोलकल पर्वतावर सुमारे ३००० फूट उंचीवर आहे. 'एकदंत' नावाची गणेशमूर्ती 11व्या शतकात छिंदक नागवंशी राजघराण्यातील राजांनी स्थापन केली होती आणि एका हातात कुऱ्हाड (फरसा) आणि दुसऱ्या हातात तुटलेली दात धरलेली आहे. मूर्ती ढोलकल पर्वताच्या शिखरावर असलेल्या बैलादिला डोंगररांगेचा एक भाग असलेल्या मूर्तीची स्थापना ऋषी परशुराम आणि गणेश यांच्यातील युद्धाच्या स्मरणार्थ करण्यात आली. ही मूर्ती ११ व्या शतकात कोरली आणि स्थापित केली गेली आणि त्याची नियमित पूजा केली जात असे. ही मूर्ती सुमारे ३ फूट उंच आणि ५०० ​​किलोपेक्षा जास्त वजनाची आहे. बस्तरच्या खोल, अभेद्य जंगलांमध्ये ग्रॅनाइटच्या घन तुकड्यातून कोरलेली गणेश मूर्ती बसलेली आहे. ढोलकल गणेश मंदिर यात्रेकरू, ट्रेकर्स आणि इतिहास प्रेमींसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले. छत्तीसगड राज्य सरकारनेही आपल्या प्रवास कार्यक्रमांमध्ये त्याचा प्रचार करण्यास सुरुवात केली होती. स्थानिक जमातींना समृद्धी मिळाली पर्यटन वाढले म्हणजे रोजगाराच्या संधी उत्पन्न वाढले. अनेकांनी टूर गाईड आणि टूर ऑपरेटर म्हणूनही काम केले आणि फरसाल नावाच्या बेस कॅम्पमधील घनदाट जंगल अचानक ११०० वर्ष जुन्या गणेशमूर्तीला आदरांजली वाहण्यासाठी जात असलेल्या लोकांची गर्दी असत असे. बस्तर आणि दंतेवाडा भागातील स्थानिक आदिवासींना समृद्धी आणणारी ढोलकल गणेश मूर्तीचे दृश्य बस्तरच्या आसपासच्या भागात राहणाऱ्या माओवादी दहशतवाद्यांना असह्य होते. राज्य-प्रोत्साहित पर्यटनामुळे स्थानिक जमाती पैसे कमावतात आणि चांगल्या जीवनाची आशा बाळगतात हे त्यांना पाहता आले नाही. जानेवारी २०१७ मध्ये, प्रचंड ढोलकल गणेश मूर्ती त्याच्या 3,000 फूट उंचीवरून बस्तरच्या जंगलात टाकण्यात आली. मूर्तीचे तुकडे तुकडे होऊन स्थानिक गरीब रहिवाशांच्या आशा नष्ट झाल्या. माओवाद्यांनी या प्रदेशाचा आर्थिक विकास थांबवण्यासाठी आणि अभ्यागतांना परिसरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी हा विनाश घडवून आणला होता.[] भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे ढोलकल टेकडीवर एकदंत मूर्ती तिच्या मूळ जागेवर पुनर्संचयित करण्यात आली आणि स्थानिक धार्मिक संस्कारांद्वारे कार्यक्रम करण्यात आले. स्थानिक लोक वर्षभर गणेशाची पूजा करतात आणि जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान 'माघ' महिन्यात या ठिकाणी एक जत्रा भरते.

भूगोल

[संपादन]

छत्तीसगढ राज्य आकारमानाच्या दृष्टीने भारतातील ९ व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे ७०० कि. मी. असून उत्तर-दक्षिण रुंदी सुमारे ४३५ कि. मी. आहे. छत्तीसगढ राज्यात पुढील नद्या आहेत[]:

  • शिवनाथ
  • सोंढुर
  • महानदी
  • हसदेव
  • अर्पा
  • झोंक
  • गोदावरी
  • पायरे
  • इंद्रावती
  • सोन
  • रिहांद
  • तांदुला
  • कन्हार
  • सबरी
  • === सीमा ===

छत्तीसगढ राज्याच्या उत्तरेला उत्तर प्रदेश व झारखंड, वायव्येला मध्य प्रदेश, पश्चिमेला महाराष्ट्र, दक्षिणेला आंध्र प्रदेश व पूर्वेला ओडीशा ही राज्य आहेत.

जिल्हे

[संपादन]

छत्तीसगढ राज्यात २७ जिल्हे आहेत. यावरील विस्तृत लेख येथे आहे.

वनसंपदा

[संपादन]
रान हल्या, छत्तीसगढचा राज्य प्राणी
डोंगरी मैना, छत्तीसगढचा राज्य पक्षी

राज्यात ३ राष्ट्रीय उद्याने आणि १० अभयारण्ये आहेत. यावरील माहितीसाठी छत्तीसगढमधील राष्ट्रीय उद्याने आणि छत्तीसगढमधील अभयारण्ये येथे भेट द्या.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. ^ "इतिहास | जिला दंतेवाड़ा, छत्तीसगढ शासन | India" (हिंदी भाषेत). 2022-09-01 रोजी पाहिले.
  2. ^ Jan 28, Rashmi Drolia / TNN / Updated:; 2017; Ist, 11:50. "1100-year-old Ganesha idol falls from Bastar hilltop, cops suspect Maoists' role | Raipur News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-09-01 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  3. ^ Team, Editorial (2021-05-21). "छत्तीसगढ़ राज्य का इतिहास और जानकारी | Chhattisgarh History in Hindi". GyaniPandit (इंग्रजी भाषेत). 2022-09-01 रोजी पाहिले.