Jump to content

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष
Speaker Maharashtra Legislative Assembly
महाराष्ट्र शासनाची राजमुद्रा
भारताचे ध्वजचिन्ह
विद्यमान
राहुल नार्वेकर

०३ जुलै २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा प्रमुख महाराष्ट्र विधानसभा
सदस्यता महाराष्ट्र विधानसभा
वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्राचे राज्यपाल
मुख्यालय मुंबई
नामांकन कर्ता सदस्य महाराष्ट्र विधानसभा
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी श्री. नाना फाल्गुनराव पटोले (२०१९ - २०२१)
निर्मिती १९६०
पहिले पदधारक श्री. सयाजी लक्ष्मण सिलम (१९६० -१९६२)
उपाधिकारी श्री. झिरवाळ नरहरी सिताराम (उपध्यक्ष)
वेतन २ लाख

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हे महाराष्ट्र राज्याची मुख्य कायदा बनवणारी संस्था महाराष्ट्र विधानसभेचे पीठासीन अधिकारी आहेत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्याच बैठकीत सदस्यांच्या बहुमताने ५ वर्षांच्या कालावधीसाठी विधानसभा अध्यक्षाची निवड केली जाते. या कालावधीमध्ये विधानसभेचे सदस्यत्व सोडेपर्यंत किंवा पदाचा राजीनामा देईपर्यंत अध्यक्ष पद धारण करता येते, परंतु विधानसभा सदस्यांच्या प्रभावी बहुमताने मंजूर केलेल्या ठरावाद्वारे विधानसभा अध्यक्षांना पदावरून दूर केले जाऊ शकते.[] अध्यक्षांच्या अनुपस्थितीत, महाराष्ट्र विधानसभेची बैठक विधानसभा उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होते.[]

विधानसभेचे अध्यक्ष हे विधानसभा सभागृहातील कामकाज चालवतात आणि सभागृहात सादर केलेले विधेयक हे धन विधेयक आहे की नाही हे ठरवतात. ते सभागृहामध्ये शिस्त आणि शिष्टाचार राखतात आणि सदस्यांना त्यांच्या अनियंत्रित वर्तनासाठी त्यांना निलंबित करून शिक्षा देखील करू शकतात. ते नियमांनुसार अविश्वास प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव, निंदा प्रस्ताव आणि लक्षवेधी सूचना यांसारखे विविध प्रकारचे ठराव सभागृहात मांडण्यास परवानगी देतात. चर्चा सत्रात चर्चेसाठी कोणत्या विषयपत्रिकेवर निर्णय घ्यायचा ते देखील अध्यक्ष ठरवतात. अध्यक्ष निवडीची तारीख महाराष्ट्राचे राज्यपाल निश्चित करतात. सभागृहाच्या सदस्यांनी केलेल्या सर्व टिप्पण्या आणि भाषणे ही अध्यक्षांना उद्देशून असतात, अध्यक्ष हा सभागृहाला उत्तरदायी असतो.[]

राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.[]

पात्रता

[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांची यादी

[संपादन]

राज्य विधानसभा अध्यक्ष (सन १९३७ ते वर्तमान).[]

# नाव मतदारसंघ कालावधी विधानसभा

(निवडणूक)

पक्ष
स्वातंत्र्यपूर्व मुंबई राज्य विधानसभा (१९३७–४७)
गणेश वासुदेव मावळणकर २१ जुलै १९३७ २० जानेवारी १९४६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कुंदनमल सोभाचंद फिरोदिया ३० जानेवारी १९४६ १४ ऑगस्ट १९४७
स्वातंत्र्योत्तर मुंबई राज्य विधानसभा (१९४७–५६)
(२) कुंदनमल सोभाचंद फिरोदिया १५ ऑगस्ट १९४७ ३१ जानेवारी १९५२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दत्तात्रय काशिनाथ कुंटे ५ मे १९५२ ३१ ऑक्टोबर १९५६
द्विभाषिक मुंबई राज्य विधानसभा (१९५६ ते १९६०)
सयाजी लक्ष्मण सिलम २१ नोव्हेंबर १९५६ ३० एप्रिल १९६० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महाराष्ट्र विधानसभा (स्थापना १९६०)
(४) सयाजी लक्ष्मण सिलम १ मे १९६० १२ मार्च १९६२ पहिली

(१९५७)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
त्र्यंबक (उर्फ बाळासाहेब) शिवराम भारदे अहमदनगर दक्षिण १७ मार्च १९६२ १३ मार्च १९६७ दुसरी

(१९६२)

पाथर्डी १५ मार्च १९६७ १५ मार्च १९७२ तिसरी

(१९६७)

शेषराव कृष्णराव वानखेडे कळमेश्वर २२ मार्च १९७२ २० एप्रिल १९७७ चौथी

(१९७२)

दौलतराव श्रीपतराव उर्फ बाळासाहेब देसाई ४ जुलै १९७७ १३ मार्च १९७८
शिवराज विश्वनाथ पाटील लातूर १७ मार्च १९७८ ६ डिसेंबर १९७९ पाचवी

(१९७८)

प्राणलाल हरकिशनदास व्होरा विलेपार्ले १ फेब्रुवारी १९८० २९ जून १९८०
१० शरद शंकर दिघे वरळी २ जुलै १९८० ११ जानेवारी १९८५ सहावी

(१९८०)

११ शंकरराव चिमाजी जगताप कोरेगाव २० मार्च १९८५ १९ मार्च १९९० सातवी

(१९८५)

१२ मधुकरराव धनाजी चौधरी २५ मार्च १९९० २२ मार्च १९९५ आठवी

(१९९०)

१३ दत्ताजी शंकर नलावडे वरळी २४ मार्च १९९५ १९ ऑक्टोबर १९९९ नववी

(१९९५)

शिवसेना
१४ अरुणलाल गोवर्धनदास गुजराती चोपडा २२ ऑक्टोबर १९९९ १७ ऑक्टोबर २००४ दहावी

(१९९९)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ कृष्णराव रखमाजीराव देसाई उर्फ बाबासाहेब कुपेकर गडहिंग्लज ६ नोव्हेंबर २००४ ३ नोव्हेंबर २००९ अकरावी

(२००४)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
१६ दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील आंबेगाव ११ नोव्हेंबर २००९ ८ नोव्हेंबर २०१४ बारावी

(२००९)

१७ हरिभाऊ किसनराव बागडे औरंगाबाद पूर्व १२ नोव्हेंबर २०१४ २५ नोव्हेंबर २०१९ तेरावी

(२०१४)

भारतीय जनता पक्ष
१८ नाना फाल्गुनराव पटोले साकोली १ डिसेंबर २०१९ ४ फेब्रुवारी २०२१ चौदावी

(२०१९)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ राहुल सुरेश नार्वेकर कुलाबा ३ जुलै २०२२ विद्यमान भारतीय जनता पक्ष

हंगामी अध्यक्ष

[संपादन]
# नाव कालावधी
स्वातंत्र्यपूर्व मुंबई राज्य विधानसभा (१९३७–४७)
रावबहादुर गणेश कृष्णा चितळे १९ जुलै १९३७ २१ जुलै १९३७
सोराबजी दोराबजी सकलटवाला २० मे १९४६ २१ मे १९४६
स्वातंत्र्योत्तर मुंबई राज्य विधानसभा (१९४७–५६)
डॉ. एम. यु. मास्कोरेन्हस ०३ मे १९५२ ०५ मे १९५२
द्विभाषिक मुंबई राज्य विधानसभा (१९५६ ते १९६०)
एम. सी. शहा ७ नोव्हेंबर १९५६ २१ नोव्हेंबर १९५६
कल्याणजीभाई मेहता १८ जून १९५७ १९ जून १९५७
महाराष्ट्र विधानसभा (स्थापना १९६०)
भानुशंकर याज्ञिक १५ मार्च १९६२ १७ मार्च १९६२
वसंत नारायण नाईक १३ मार्च १९६७ १५ मार्च १९६७
रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार २० मार्च १९७२ २२ मार्च १९७२
डी. एस. उर्फ बाळासाहेब देसाई २५ एप्रिल १९७७ ०१ जुलै १९७७
१० पी. के. देशमुख ०१ जुलै १९७७ ०५ जुलै १९७७
११ डी. एस. उर्फ बाळासाहेब देसाई १४ मार्च १९७८ १७ मार्च १९७८
१२ डी. एस. उर्फ बाळासाहेब देसाई ३० जून १९८० ०२ जुलै १९८०
१३ केशवराव शंकरराव धोंडगे १६ मार्च १९८५ २० मार्च १९८५
१४ गणपतराव अण्णासाहेब देशमुख १८ मार्च १९९० २१ मार्च १९९०
१५ रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार २२ मार्च १९९५ २४ मार्च १९९५
१६ शंकरराव गेणुजी कोल्हे २० ऑक्टोबर १९९९ २२ ऑक्टोबर १९९९
१७ गणपतराव अण्णासाहेब देशमुख ०४ नोव्हेंबर २००४ ०६ नोव्हेंबर २००४
१८ गणपतराव अण्णासाहेब देशमुख ०९ नोव्हेंबर २००९ ११ नोव्हेंबर २००९
१९ जिवा पांडू गावित १० नोव्हेंबर २०१४ १२ नोव्हेंबर २०१४
कालिदास निळकंठ कोळंबकर २६ नोव्हेंबर २०१९ २९ नोव्हेंबर २०१९
१८ दिलीप दत्तात्रय पळसे-पाटील ३० नोव्हेंबर २०१९ ०१ डिसेंबर २०१९
१९


बाह्य दुवे

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "विश्लेषण: विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव, पण अजित पवारांनी सांगितला वेगळाच नियम; नेमकी काय आहे तरतूद?". Loksatta. 2023-02-26 रोजी पाहिले.
  2. ^ a b Marathi, TV9 (2019-12-01). "विधानसभा अध्यक्षांंचं कार्य काय? कोणकोणते अधिकार?". TV9 Marathi. 2023-02-26 रोजी पाहिले.
  3. ^ "शिवसेनेचे वकील ते 'शिंदे' सरकारचे विधानसभा अध्यक्ष, असा आहे राहुल नार्वेकरांचा राजकीय प्रवास..."
  4. ^ "महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांची यादी" (PDF).