Jump to content

पुसद विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुसद विधानसभा मतदारसंघ - ८१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पुसद मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. पुसद तालुका आणि २. महागांव तालुक्यातील काळी (दौ. खा ) हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो. पुसद हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंद्रनील मनोहर नाईक हे पुसद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

पुसद विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • पुसद तालुका
  • महागांव तालुका : काळी महसूल मंडळ

पुसद मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२[n १] दौलत लक्ष्मण खडसे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वसंतराव फुलसिंह नाईक
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७[n १] दौलत लक्ष्मण खडसे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वसंतराव फुलसिंह नाईक
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ वसंतराव फुलसिंह नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७
१९७२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ सुधाकरराव राजुसिंह नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९८० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८५
१९९०
१९९५ मनोहरराव राजुसिंह नाईक
१९९९ सुधाकरराव राजुसिंह नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००४ मनोहरराव राजुसिंह नाईक
२००९
२०१४
२०१९ इंद्रनील मनोहरराव नाईक
२०२४ इंद्रनील मनोहरराव नाईक

निवडणूक निकाल

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

नोंदी

[संपादन]
  1. ^ a b द्विसदस्यीय जागा.
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).