महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९
भारत
२००९ ←
ऑक्टोबर १५, २०१४ → २०१९

MaharashtraDistrictsBlank.png

महाराष्ट्र

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

पृथ्वीराज चव्हाण

निर्वाचित मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ १५ ऑक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच फेरीत घेतली गेली. ह्या निवडणुकीमधून महाराष्ट्र विधानसभेमधील सर्व २८८ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. १९ ऑक्टोबर २०१४ रोजी मतमोजणी व निवडणुकीचे निकाल घोषित केले गेले. यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या. शिवसेनेस ६३, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या.

२०१४ लोकसभा निवडणुकांमधील अपयशाच्या पार्श्वभूमीवर सत्तेवर असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्यांनी आपली आघाडी मोडत निवडणुक वेगळ्याने लढवण्याचे ठरवले. तसेच जागावाटपावरून एकमत होऊ न शकल्यामुळे भारतीय जनता पक्षशिवसेना ह्यांची २५ वर्षे सुरू असलेली युतीदेखील संपुष्टात आली. ह्यामुळे महाराष्ट्रामधील सर्व प्रमुख मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढत झाली.

प्रमुख पक्ष[संपादन]

पक्ष नेता मागील जागा २०१४मध्ये जिंकलेल्या जागा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
Prithviraj Chavan - India Economic Summit 2011.jpgपृथ्वीराज चव्हाण
८२ ४२
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
Ajit Pawar.jpgअजित पवार
६२ ४१
भारतीय जनता पक्ष

देवेंद्र फडणवीस
४६ १२२
शिवसेना
Uddhav thackeray 20090703.jpg
उद्धव ठाकरे
४५ ६३
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Raj Thackeray2.jpg
राज ठाकरे
१३

निकाल[संपादन]

  भारतीय जनता पार्टी: १२२ जागा
  शिवसेना: ६३ जागा
  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: ४२ जागा
  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: ४१ जागा
  बहुजन विकास आघाडी: ३ जागा
  शेतकरी कामगार पक्ष: ३ जागा
  अखिल भारतीय मजलेस ए इत्तेहादुल मुसलमीन: २ जागा
  भारिप बहुजन महासंघ: १ जागा
  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष: १ जागा
  महाराष्ट्र नवनिर्माण सेना: १ जागा
  राष्ट्रीय समाज पक्ष: १ जागा
  समाजवादी पक्ष: १ जागा
  अपक्ष: ७ जागा
पक्ष जागा जिंकल्या मते मते % बदल
भारतीय जनता पार्टी १२२ १४,७०९,४५५ २७.८%
शिवसेना ६३ १०,२३५,९७२ १९.३%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४२ ९,४९६,१४४ १८.०%
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ४१ ९,१२२,२९९ १७.२%
बहुजन विकास आघाडी ३२९,४५७ ०.६%
शेतकरी कामगार पक्ष ५३३,३०९ १.०%
अखिल भारतीय मजलेस ए इत्तेहादुल मुसलमीन ४८९,६१४ ०.९%
भारिप बहुजन महासंघ ४७२,९२५ ०.९%
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) २०७,९३३ ०.४%
महाराष्ट्र नवनिर्माण सेना १,६६५,०३३ ३.७%
राष्ट्रीय समाज पक्ष २५६,६६२ ०.५%
समाजवादी पक्ष ९२,३०४ ०.२%
अपक्ष २,४९४,०१६ ४.७% नाही
एकूण २८८ नाही

विभागानुसार निकाल[संपादन]

विभागवार संख्याबळ[संपादन]

विभाग/पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप मनसे इतर
उत्तर महाराष्ट्र १६
विदर्भ १० ४३
मराठवाडा ११ १५
मुंबई शहर आणि उपनगर व ठाणे २१ २४
कोकण ०७
पश्चिम महाराष्ट्र १० १९ १३ २४
एकूण ४२ ४१ ६३ १२२ १९
. सर्वाधिक जागा

उत्तर महाराष्ट्र[संपादन]

विदर्भ[संपादन]