Jump to content

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ - ७२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार बल्लारपूर मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील १. मूल, २. पोंभूर्णा, ३. बल्लारपूर हे संपूर्ण तालुके व ४. गोंडपिपरी तालुक्यातील १ महसूल मंडळ ५. चंद्रपूर तालुक्यातील चंद्रपूर आणि चंद्रपूर रयतवारी या महसूल मंडळांचा समावेश होतो. बल्लारपूर हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाचे सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार हे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  1. बल्लारपूर तालुका
  2. मूल तालुका
  3. पोंभूर्णा तालुका
  4. गोंडपिपरी तालुक्यातील काही महसूल मंडळ
  5. चंद्रपूर तालुक्यातील : चंद्रपूर-रयतवारी महसूल मंडळ

बल्लारपूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
२००९ पूर्वी: चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचा भाग
२००९ सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार भारतीय जनता पक्ष
२०१४
२०१९
२०२४

निवडणूक निकाल

[संपादन]



  1. "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).