महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या पानावरून पुनर्निर्देशित)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
Chief Minister of Maharashtra
Seal of Maharashtra.png
Eknath Sambhaji Shinde.jpg
विद्यमान
एकनाथ शिंदे

३० जून २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा राज्यशासनाचे प्रमुख
सदस्यता महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास वर्षा निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक यशवंतराव चव्हाण (१९६०-१९६२)
उपाधिकारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्यशासनाचे प्रमुख असतात. विधानसभा निवडणुकांमध्ये बहुमत मिळालेल्या पक्षाच्या नेत्याला महाराष्ट्राचे राज्यपाल सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतात. यानंतरच्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात मतदान होउन बहुमत मिळाल्यास अधिकृतरीत्या ते मुख्यमंत्री होतात.

२०१९ च्या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षास स्पष्ट बहुमत मिळाले नाही, त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. विधानसभेतील सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सरकार स्थापना करण्याचा दावा केला व देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. परंतु सभागृहातील चाचणी मतामध्ये बहुमत मिळणार नाही हे तीन दिवसांत स्पष्ट झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा मध्यस्थीने शरद पवार, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन केले व उद्धव ठाकरे यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

सूची[संपादन]

मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री[संपादन]

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री[संपादन]

# चित्र नाव मतदारसंघ कार्यकाळ विधानसभा
(निवडणूक)
पक्ष
Yashwantrao Chavan 2010 stamp of India.jpg
यशवंतराव चव्हाण कराड उत्तर १ मे १९६० २० नोव्हेंबर १९६२ 2 वर्षे, 203 दिवस पहिला
(१९५७)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मारोतराव कन्नमवार साओली २० नोव्हेंबर १९६२ २४ नोव्हेंबर १९६३ 1 वर्ष, 4 दिवस दुसरा
(१९६२)
बाळासाहेब सावंत चिपळूण २५ नोव्हेंबर १९६३ ५ डिसेंबर १९६३ 10 दिवस
Vasantrao Naik portrait.jpg वसंतराव नाईक पुसद ५ डिसेंबर १९६३ १ मार्च १९६७ 11वर्ष, 78 दिवस
१ मार्च १९६७ १३ मार्च १९७२ तिसरी
(१९६७)
१३ मार्च १९७२ २१ फेब्रुवारी १९७५ चौथा
(१९७२)
Shankarrao Chavan 2007 stamp of India (cropped).jpg शंकरराव चव्हाण भोकर २१ फेब्रुवारी १९७५ १७ मे १९७७ 2 वर्ष, 85 दिवस
Vasantdada Patil 2012 stamp of India.jpg वसंतराव दादा पाटील विधान परिषद सदस्य १७ मे १९७७ ५ मार्च १९७८ 1 वर्ष, 62 दिवस
सांगली ५ मार्च १९७८ १८ जुलै १९७८ पाचवा
(१९७८)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (अरसू)
Sharad Pawar, Minister of AgricultureCrop.jpg
शरद पवार बारामती १८ जुलै १९७८ १७ फेब्रुवारी १९८० 1 वर्ष, 214 दिवस भारतीय काँग्रेस (समाजवादी)
State Emblem of India राष्ट्रपती राजवट १७ फेब्रुवारी १९८० ९ जून १९८० 112 दिवस विरघळली N/A
अब्दुल रहमान अंतुले श्रीवर्धन ९ जून १९८० २१ जानेवारी १९८२ 1 वर्ष, 226 दिवस सहावी
(१९८०)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बाबासाहेब भोसले नेहरूनगर २१ जानेवारी १९८२ २ फेब्रुवारी १९८३ 1 वर्ष, 12 दिवस
(६) Vasantdada Patil 2012 stamp of India.jpg वसंतराव दादा पाटील सांगली २ फेब्रुवारी १९८३ ३ जून १९८५ 2 वर्ष, 121 दिवस
१० शिवाजीराव निलंगेकर निलंगा ३ जून १९८५ १२ मार्च १९८६ 282 दिवस सातवी
(१९८५)
(५) Shankarrao Chavan 2007 stamp of India (cropped).jpg शंकरराव चव्हाण विधान परिषद सदस्य १२ मार्च १९८६ २६ जून १९८८ 2 वर्ष, 106 दिवस
(७)
Sharad Pawar, Minister of AgricultureCrop.jpg
शरद पवार बारामती २६ जून १९८८ ४ मार्च १९९० 2 वर्ष, 364 दिवस
४ मार्च १९९० २५ जून १९९१ आठवी
(१९९०)
११ सुधाकरराव नाईक पुसद २५ जून १९९१ ६ मार्च १९९३ 1 वर्ष, 254 दिवस
(७)
Sharad Pawar, Minister of AgricultureCrop.jpg
शरद पवार विधान परिषद सदस्य ६ मार्च १९९३ १४ मार्च १९९५ 2 वर्ष, 8 दिवस
१२ Manohar Joshi cropped.jpg मनोहर जोशी दादर १४ मार्च १९९५ १ फेब्रुवारी १९९९ 3 वर्ष, 324 दिवस नववी
(१९९५)
शिवसेना
१३ Narayan Rane (cropped).jpg नारायण राणे मालवण १ फेब्रुवारी १९९९ १८ ऑक्टोबर १९९९ 259 दिवस
१४
Vilasrao Deshmukh at Innovation Partnerships Event May 8, 2012.jpg
विलासराव देशमुख लातूर शहर १८ ऑक्टोबर १९९९ १८ जानेवारी २००३ 3 वर्ष, 92 दिवस दहावी
(१९९९)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५
Sushilkumar Shinde.JPG
सुशीलकुमार शिंदे सोलापूर दक्षिण १८ जानेवारी २००३ १ नोव्हेंबर २००४ 1 वर्ष, 288 दिवस
(१४)
Vilasrao Deshmukh at Innovation Partnerships Event May 8, 2012.jpg
विलासराव देशमुख लातूर शहर १ नोव्हेंबर २००४ ८ डिसेंबर २००८ 4 वर्ष, 37 दिवस अकरावी
(२००४)
१६
Ashok Chavan.jpg
अशोक चव्हाण भोकर ८ डिसेंबर २००८ ७ नोव्हेंबर २००९ 1 वर्ष, 338 दिवस
७ नोव्हेंबर २००९ ११ नोव्हेंबर २०१० बारावी
(२००९)
१७
Prithviraj Chavan - India Economic Summit 2011.jpg
पृथ्वीराज चव्हाण विधान परिषद सदस्य ११ नोव्हेंबर २०१० २८ सप्टेंबर २०१४ 3 वर्ष, 321 दिवस
State Emblem of India राष्ट्रपती राजवट २८ सप्टेंबर २०१४ ३१ ऑक्टोबर २०१४ 32 दिवस विरघळली N/A
१८ Devendra Fadnavis StockFreeImage.png देवेंद्र फडणवीस नैर्ऋत्य नागपूर ३१ ऑक्टोबर २०१४ १२ नोव्हेंबर २०१९ 5 वर्ष, 12 दिवस तेरावी
(२०१४)
भारतीय जनता पक्ष
State Emblem of India राष्ट्रपती राजवट १२ नोव्हेंबर २०१९ २३ नोव्हेंबर २०१९ 11 दिवस चौदावी
(२०१९)
N/A
(१८) Devendra Fadnavis StockFreeImage.png देवेंद्र फडणवीस नैर्ऋत्य नागपूर २३ नोव्हेंबर २०१९ २८ नोव्हेंबर २०१९ 5 दिवस भारतीय जनता पक्ष
१९
The Chief Minister of Maharashtra, Shri Uddhav Thackeray calling on the Prime Minister, Shri Narendra Modi, in New Delhi on February 21, 2020 (Uddhav Thackeray) (cropped).jpg
उद्धव ठाकरे विधान परिषद सदस्य २८ नोव्हेंबर २०१९ ३० जून २०२२ 2 वर्ष, 214 दिवस शिवसेना
२०
Eknath Sambhaji Shinde.jpg
एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडी ३० जून २०२२ पदावर असलेला

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]