शिवडी विधानसभा मतदारसंघ
Appearance
शिवडी विधानसभा मतदारसंघ - १८३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, शिवडी मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. ६२८ परेल, जनगणना वॉर्ड क्र.८३७ चिंचपोकळी मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते २६ आणि १८७, जनगणना वॉर्ड क्र.८३५ प्रभादेवी मधील इन्युमरेशन ब्लॉक १६४ ते १८१, १८३ ते २११, जनगणना वॉर्ड क्र. ६२९ शिवडी मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ३१, ४९ ते ३०३, ३०७, ३०८ आणि ३११ ते ३१७ यांचा समावेश होतो. शिवडी हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शिवसेनेचे अजय विनायक चौधरी हे शिवडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | अजय विनायक चौधरी | शिवसेना | |
२०१४ | अजय विनायक चौधरी | शिवसेना | |
२००९ | बाळा दगडू नांदगावकर | महाराष्ट्र नवनिर्माण सेना |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
शिवडी | ||
उमेदवार | पक्ष | मत |
बाळा दगडु नंदगावकर | मनसे | ६४,३७५ |
दगडू सकपाळ | शिवसेना | ५७,९१२ |
स्मिता चौधरी | काँग्रेस | १५,४३१ |
नारायण सखाराम घागरे | भाकप | १,५५२ |
तानाजी शिवराम वायदंडे | बसपा | ७४७ |
रामदास सीताराम भोजने | अपक्ष | ४९१ |
गणेश सोनू पवार | अपक्ष | ३१७ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर शिवडी विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |