Jump to content

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ - ६३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अर्जुनी मोरगाव मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील १. सडक-अर्जुनी तालुका, २. अर्जुनी मोरगांव तालुका आणि ३. गोरेगांव तालुक्यातील मोहाडी महसूल मंडळ यांचा समावेश होतो. अर्जुनी मोरगाव हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[][]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे हे अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • सडक अर्जुनी तालुका
  • अर्जुनी मोरगांव तालुका
  • गोरेगांव तालुका : मोहाडी महसूल मंडळ

अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
१९६७ पूर्वी : सडक अर्जुनी विधानसभा मतदारसंघ
१९६७ सोनू अडकू पॉलझगडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८-२००९ : गोरेगाव विधानसभा मतदारसंघ
२००९ राजकुमार सुदामजी बडोले भारतीय जनता पक्ष
२०१४
२०१९ मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).