Jump to content

तिरोडा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तिरोरा विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

तिरोडा विधानसभा मतदारसंघ - ६४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, तिरोडा मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील १. तिरोडा तालुका आणि तिरोडा नगरपालिका, २. गोंदिया तालुक्यातील गंगाझरी महसूल मंडळ आणि ३. गोरेगांव तालुक्यातील गोरेगांव महसूल मंडळ या क्षेत्राचा समावेश होतो. तिरोडा हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाचे विजय भरतलाल रहांगडाले हे तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

तिरोडा विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • तिरोडा तालुका : तिरोडा नगरपालिका
  • गोंदिया तालुका : गंगाझरी महसूल मंडळ
  • गोरेगांव तालुका : गोरेगांव महसूल मंडळ

तिरोडा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२ शाळीग्राम रामरतन दिक्षित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७ शाळीग्राम रामरतन दिक्षित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ शाळीग्राम रामरतन दिक्षित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७ बी.एल. पटेल
१९७२ शाळीग्राम रामरतन दिक्षित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ लक्ष्मीनारायण गणपत वासनिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८० सुखदेव विठोबा डोंगरे
१९८५ हरिश उकंडराव मोरे भारतीय काँग्रेस (समाजवादी)
१९९० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९९५ भजनदास विठोबा वैद्य भारतीय जनता पक्ष
१९९९
२००४ दिलीप वामन बनसोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ खुशाल परसराम बोपाचें भारतीय जनता पक्ष
२०१४ विजय भरतलाल रहांगडाले
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).