उमरगा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उमरगा विधानसभा मतदारसंघ - २४० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, उमरगा मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा आणि उमरगा या दोन तालुक्यांचा समावेश होतो. उमरगा हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

शिवसेनेचे ज्ञानराज धोंडिराम चौगुले हे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ ज्ञानराज धोंडिराम चौगुले शिवसेना
२०१४ ज्ञानराज धोंडिराम चौगुले शिवसेना
२००९ ज्ञानराज धोंडिराम चौगुले शिवसेना

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".