कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
Appearance
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - १४४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कल्याण ग्रामीण मतदारसंघात ठाणे जिल्ह्याच्या १. ठाणे तालुक्यातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ६ आणि ७ आणि ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ६ आणि ७, २. कल्याण तालुक्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ३१ ते ३४, ५१ ते ५६, ६६, ६७ आणि ६९ ते ७७, कल्याण महसूल मंडळ (भाग) निळजे आणि हेदुटणे सझा यांचा समावेश होतो. कल्याण ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमोद (राजू) रतन पाटील हे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | प्रमोद (राजू) रतन पाटील | महाराष्ट्र नवनिर्माण सेना | |
२०१४ | सुभाष गणू भोईर | शिवसेना | |
२००९ | रमेश रतन पाटील | महाराष्ट्र नवनिर्माण सेना |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
कल्याण ग्रामीण | ||
उमेदवार | पक्ष | मत |
रमेश रतन पाटील | मनसे | ५१,१४९ |
रमेश सुकऱ्या म्हात्रे | शिवसेना | ४१,६४२ |
रवी पाटील | काँग्रेस | २६,५४६ |
मारुती सुखाजी वानखेडे | बसपा | १,२३७ |
विद्याचंद्र दिगंबर दिक्षित | अपक्ष | ९९४ |
राजकांत परशुराम पाटील | अपक्ष | ८७० |
सूरजप्रकाश गोविंद शर्मा | रिपाई (आ) | ६७७ |
अन्सारी हुसेन करीम निबार | आंनॅकॉं | ५१८ |
विजयी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".