दिलीप वळसे पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिलीप वळसे पाटील

कार्यकाळ
इ.स. २००९ – १० जून, इ.स. २०११
मतदारसंघ आंबेगाव

राजकीय पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस
धर्म हिंदू धर्म

उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरवात केली. राज्यभर फिरून त्यांनी महाराष्ट्र जाणून घेतला. १९९० साली आंबेगाव तालुक्‍यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे-पाटील यांचा उदय झाला. वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. त्यावेळी जनता दलाचे खासदार असलेले किसनराव बाणखेले यांचा तालुक्‍यावर प्रभाव होता. मात्र, १९९० च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून वळसे-पाटील यांनी बाणखेले यांचे गुरू अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना पराभूत केले. त्यानंतर आजपर्यंत सलग पाचवेळा विजय मिळवून वीस वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. युतीचे सरकार असताना विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण  विभाग, ऊर्जा विभागासारखे महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे होते. त्यानंतर मिळालेल्या अर्थखात्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. २००९ ते २०१४ या कालखंडात विधानसभेचे अध्यक्ष पद स्वीकारून पदाची उंची वाढविण्यासाठी महत्त्वाचे योगदान. मतदार संघातील माळीण गावात दुर्दैवी झालेल्या घटनेत जातीने लक्ष घालून आपत्तीच्या दिवसापासून ते पुनर्वसनामध्ये जातीने लक्ष घालून वेगळेपण दाखवून दिले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाच्या अध्यक्षपदी काम करत असताना साखर उद्योग व शेतकऱ्यांसाठी देशपातळीवर काम केले. १४ ऑगस्ट २०१७ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष पदावर निवड झाली. [ संदर्भ हवा ]

राजकीय कारकीर्द -

 • १९९०-९५ - विधानसभा सदस्य, आंबेगाव तालुका, जि. पुणे.
 • १९९५-९९ - विधानसभा सदस्य, आंबेगाव तालुका, जि. पुणे.
 • १९९९-०४ - विधानसभा सदस्य, आंबेगाव तालुका, जि. पुणे.
 • २००४-०९ - विधानसभा सदस्य, आंबेगाव तालुका, जि. पुणे.
 • २००९-१४ - विधानसभा सदस्य, आंबेगाव तालुका, जि. पुणे.
 • २०१४-....  - विधानसभा सदस्य, आंबेगाव तालुका, जि. पुणे.
 • वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण  विभाग, ऊर्जा विभागासारखे महत्त्वाचे मंत्री पदी कामकाज
 • संचालक - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक.
 • चेअरमन - अंदाज समिती, महाराष्ट्र शासन.
 • संस्थापक अध्यक्ष - भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि., पारगाव तर्फे अवसरी बु. ता. आंबेगाव, जि. पुणे.
 • उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार हा सन्मान प्राप्त.
 • ७ नोव्हें, २०१५ रोजी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली
 • रयत शिक्षण संस्थेत मॅनेजिंग कौन्सिल सदस्य म्हणून निवड
 • १४ ऑगस्ट २०१७ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष पदावर निवड[ संदर्भ हवा ]