अकोले विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अकोले विधानसभा मतदारसंघ - २१६ (Akole Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, अकोले मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. अकोले तालुका आणि २. संगमनेर तालुक्यातील घारगांव महसूल मंडळाचा समावेश होतो. अकोले हा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण यमाजी लहामटे हे अकोले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

अकोले मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ किरण यमाजी लहामटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ वैभव मधुकर पिचड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ मधुकर काशिनाथ पिचड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]