नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ - १२३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, नाशिक पूर्व मतदारसंघात नाशिक महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते १०, १४, १६, ३० ते ३५, ४० ते ४२ आणि ६७ ते ७० यांचा समावेश होतो. नाशिक पूर्व हा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे राहूल उत्तमराव ढिकले हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

नाशिक पूर्व मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ राहूल उत्तमराव ढिकले भारतीय जनता पक्ष
२०१४ बाळासाहेब महादू सानप भारतीय जनता पक्ष
२००९ उत्तमराव नथुजी ढिकले महाराष्ट्र नवनिर्माण सेना

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".