हातकणंगले विधानसभा मतदारसंघ
Appearance
हातकणंगले विधानसभा मतदारसंघ - २७८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, हातकणंगले मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील वाटार तर्फ वडगांव, वडगांव कसबा, हातकणंगले, हेरले, रुई, हुपरी ही महसूल मंडळे आणि वडगांव कसबा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. हातकणंगले हा विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजू (बाबा) जयवंतराव आवळे हे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | राजू (बाबा) जयवंतराव आवळे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२०१४ | सुजित वसंतराव मिणचेकर | शिवसेना | |
२००९ | सुजित वसंतराव मिणचेकर | शिवसेना |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
हातकणंगले | ||
उमेदवार | पक्ष | मत |
डॉ.सुनिल वसंतराव मिनाचेकर | शिवसेना | ५५५८३ |
राजू जयवंतराव आवळे | काँग्रेस | ५३५७९ |
राजू किसनराव आवळे | जसुश | ५११०२ |
दत्तात्रय विष्णू घाटगे | स्वाप | २४४५२ |
विक्रांत सुभाष सोनावणे | अपक्ष | ५३०३ |
मंगळराव जिन्नप्पा मलगे | बसपा | ५०५७ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |