Jump to content

देगलूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देगलूर विधानसभा मतदारसंघ - ९० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार देगलूर मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील १. देगलूर आणि २. बिलोली या दोन तालुक्यांचा समावेश होतो. देगलूर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[][]

हा मतदारसंघ इ.स. २००९ साली अस्तित्वात आला. त्याआधी याचा बहुतांश भाग बिलोली मतदारसंघात मोडत असे.

भारतीय जनता पार्टी पक्षाचे जितेश रावसाहेब अंतापुरकर हे देगलूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०२४ जितेश पाटील-अंतापूरकर भारतीय जनता पक्ष
२०२१ (पोटनिवडणूक)[] जितेश रावसाहेब अंतापुरकरपाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१९ रावसाहेब जयंता अंतापूरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सुभाष पिराजी साबणे शिवसेना
२००९ चांदोबा उर्फ रावसाहेब अंतापूरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
  5. "देगलूर पोटनिवडणूक: काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी, कशी झाली निवडणूक?".