Jump to content

राहुल नार्वेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲड. राहुल नार्वेकर

मागील नाना पटोले
कार्यकाळ
३ जुलै २०२२  २०२४

विद्यमान
पदग्रहण
२०२४
मागील राज पुरोहित
मतदारसंघ कुलाबा
कार्यकाळ
२१ नोव्हेंबर २०१९  २०२४
विद्यमान
पदग्रहण
२०२४

जन्म ११ फेब्रुवारी, १९७७ (1977-02-11) (वय: ४९)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष (२०१८ पासून)
मागील इतर राजकीय पक्ष राष्ट्रवादी (२०१४-१९)

शिवसेना (२०१४ पर्यंत)

वडील सुरेश नार्वेकर (नगरसेवक)
पत्नी राजे निंबाळकर
गुरुकुल शासकीय विधी महाविद्यालय
व्यवसाय वकीली
कार्यरत विधानसभाध्यक्ष

राहुल सुरेश नार्वेकर (जन्म: ११ फेब्रुवारी १९७७) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेचे १७वे व १८ वे अध्यक्ष आहेत. भारतामध्ये विधानसभा अध्यक्ष या पदावर बसणारे ते देशातील सर्वांत तरुण व्यक्ती आहेत.[][]

राजकीय कारकीर्द

[संपादन]

राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही शिवसेनेपासून झाली. शिवसेनेत ते प्रवक्तेपदावर होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राहुल नार्वेकर यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ साली त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नार्वेकर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये सामील झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत ते भाजपच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. शिवाय भाजपकडून त्यांना मीडिया इंचार्ज पदाची जबाबदारीही देण्यात आली होती.[]

वैयक्तिक आयुष्य

[संपादन]

राहुल नार्वेकर यांचे वडील सुरेश नार्वेकर मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक होते.

  • त्यांचे भाऊ मकरंद आणि वहिनी हर्षिता या सध्या मुंबई महापालिकेत भाजपकडून नगरसेवक आहेत.
  • महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राष्ट्रवादीचे रामराजे नाईक-निंबाळकर हे राहुल नार्वेकरांचे सासरे आहेत.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "शिवसेनेचे वकील ते 'शिंदे' सरकारचे विधानसभा अध्यक्ष, असा आहे राहुल नार्वेकरांचा राजकीय प्रवास..."
  2. टीम, एबीपी माझा वेब (2022-07-03). "Rahul Narvekar:राहुल नार्वेकर 20वे विधानसभा अध्यक्ष; सासरे अन् जावयाकडे विधिमंडळाच्या 'चाव्या'!". marathi.abplive.com. 2022-07-06 रोजी पाहिले.
  3. Marathi, TV9 (2022-07-01). "Maharashtra Assembly | विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन उपस्थित". TV9 Marathi. 2022-07-06 रोजी पाहिले.
  4. "महाराष्ट्राच्या विधिमंडळात फॅमिली राज, सासरा सभापती तर जावई होणार अध्यक्ष". News18 Lokmat. 2022-07-01. 2022-07-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-07-06 रोजी पाहिले.