गंगापूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गंगापूर विधानसभा मतदारसंघ - १११ (Gangapur Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, गंगापूर मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्याच्या १. गंगापूर तालुक्यातील शेंदुरवाडा, वाळुज, हरसूल, तुर्काबाद, गंगापूर ही महसूल मंडळे आणि गंगापूर नगरपालिका आणि २. खुलताबाद तालुका यांचा समावेश होतो. गंगापूर हा विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे प्रशांत बन्सीलाल बंब हे गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

गंगापूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ प्रशांत बन्सीलाल बंब भारतीय जनता पक्ष
२०१४ प्रशांत बन्सिलाल बंब भारतीय जनता पक्ष
२००९ प्रशांत बन्सीलाल बंब अपक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]