Jump to content

गोंदिया विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोंदिया विधानसभा मतदारसंघ - ६५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, गोंदिया मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील १. गोंदिया तालुक्यातील कामटा, रावणवाडी, दासगांव (बुद्रुक), गोंदिया ही महसूल मंडळे आणि गोंदिया न.पा. क्षेत्राचा समावेश होतो. गोंदिया हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

अपक्ष उमेदवार विनोद संतोष अग्रवाल हे गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

गोंदिया विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • गोंदिया तालुका : कामटा, रावणवाडी, दासगांव (बुद्रुक), गोंदिया महसूल मंडळे; गोंदिया नगरपालिका

गोंदिया मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२ मनोहर बाबर पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७ मनोहर बाबर पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ मनोहर बाबर पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७ गोपाळनारायण शिवविनायक बाजपाई
१९७२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ राजकुमारी गोपाळनारायण बाजपाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८०
१९८५
१९९० हरिहरभाई मणिभाई पटेल
१९९५ रमेशकुमार संपतराव कुठे शिवसेना
१९९९
२००४ गोपालदास शंकरलाल अग्रवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९
२०१४
२०१९ विनोद संतोष अग्रवाल अपक्ष
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गोंदिया विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).