शिवसेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शिवसेना
स्थापना १९ जून १९६६
मुख्यालय शिवसेना भवन, दादर, मुंबई.
युती महाराष्ट्र विकास आघाडी
लोकसभेमधील जागा १८/५४५[१]
राज्यसभेमधील जागा ४/२४५[१]
राजकीय तत्त्वे हिंदुत्व
प्रकाशने सामना
संकेतस्थळ शिवसेना.ऑर्ग

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना प्रबोधनकार ठाकरे, व तत्कालीन काँग्रेस नेत्यांच्याच कल्पनेतून एक वेगळा पर्याय असावा या उद्देशाने १९ जून १९६६ रोजी केली.[ संदर्भ हवा ] संघटनेचे प्रथम प्रमुख पद बाळ ठाकरे (शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे) यांना देण्यात आले. सर्व प्रथम १८ सदस्य हे काँग्रेस मधून आलेले होते.

बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे संभाळत आहेत.

शिवसेनेने १९८९साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप बरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले. व शिवसेनेचे मनोहर पंत जोशी हे राज्याचे मुखयमंत्री झाले.तसेच केंद्रात १९९८ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते!२०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले २०१९ साली शिवसेनेचे १८ खाजदार निवडून आले, विधानसभा निवडणुक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने ३० वर्षांची युती तोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँगेस आय यांच्या बरोबर (महाराष्ट्र विकास आघाडी) स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १७ वे मुख्यमंत्री झाले या सरकारमध्ये काँग्रेस कडे विधानसभा अध्यक्ष पद tar राष्ट्रवादी कडे उपमुख्यमंत्री पद आहे

निवडणूक चिन्ह[संपादन]

"धनुष्यबाण" हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.

शिवसेनेने निवडणुकीसाठी युती केलेले पक्ष[संपादन]

 • १९६८ : प्रजासमाजवादी पक्ष. ही युती १९७०पर्यंत टिकली. ही युती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी होती.
 • १९६९ : काँग्रेसचे इंडिकेट आणि सिंडिकेट हे दॊन्ही गट
 • १९७२ : रिपब्लिकन पक्ष (रा,सु. गवई गट)
 • १९७२ : मुस्लिम लीग (मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुरती)
 • १९७४ : काँग्रेस
 • १९७७ : दलित पँथर (काही काळापुरती)
 • १९७७ : काँग्रेस. ही युती १९८० साली तुटली.
 • १९९० ते २०१९ : भाजप
 • २००७ आणि २०१२ : काँग्रेस
 • २००८ :राष्ट्रवादी काँग्रेस

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. a b "शिवसेना खासदार". 
संदर्भ पुस्तके
 • २. शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखिका मेरी कॅटझेन्स्टाइन (१९८२)
 • ३. शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखक दीपांकर गुप्ता (१९८२)
 • ४. शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (१९९८)
 • ५. शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (२०१३)
 • ६. दी डॅशिंग लेडीज ऑफ शिवसेना : पॉलिटिकल मॅट्रोनेज इन अर्बनायझिंग इंडिया (इंग्रजी पुस्तक, लेखिका तारिणी बेदी)
 • ७. सॅफ्रन टाईड (इंग्रजी पुस्तक, लेखक किंगशुक नाग)
 • ८. सम्राट (इंग्रजी पुस्तक, लेखिका सुजाता आनंदन)
 • ९. बाळ ठाकरे (इंग्रजी पुस्तक, लेखक वैभव पुरंदरे)
 • १०. बॉम्बे मेरी जान (इंग्रजी पुस्तक, लेखक जेरी पिंटो आणि नरेश फर्नांडिस)
 • ११. महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष (लेखक - सुहास पळशीकर आणि सुहास कुलकर्णी)
 • १२. सुवर्ण महोत्सवी सेना (लेखक - विजय सामंत आणि हर्षल प्रधान)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.