अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ - २२५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा अहमदनगर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, अहमदनगर शहर मतदारसंघात अहमदनगर महानगरपालिका आणि अहमदनगर (कँटोनमेंट बोर्ड) क्षेत्राचा समावेश होतो. अहमदनगर शहर हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]