नंदुरबार विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नंदुरबार विधानसभा मतदारसंघ - ३ (Nandurbar Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, नंदुरबार मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कलसाडी, प्रकाशा, सांगरखेडा, वडाळी ही महसूल मंडळे आणि नंदुरबार तालुक्यातील कोरीट, खोंडामळी, रनाळे, नंदुरबार ही महसूल मंडळे आणि नंदुरबार नगरपालिका यांचा समावेश होतो. नंदुरबार हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे.[१]

भारतीय जनता पक्षाचे विजयकुमार गावित हे नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

नंदुरबार मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ विजयकुमार कृष्णराव गावित भारतीय जनता पक्ष
२०१४ विजयकुमार कृष्णराव गावित भारतीय जनता पक्ष
२००९ विजयकुमार कृष्णराव गावित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२००९ निवडणुक[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]