Jump to content

भायखळा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भायखळा विधानसभा मतदारसंघ - १८४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, भायखळा मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. ५२२ माझगांव, जनगणना वॉर्ड क्र. ५२३- ताडवाडी, जनगणना वॉर्ड क्र. ५२४ - १ ला नागपाडा आणि जनगणना वॉर्ड क्र. ५२७ - भायखळा यांचा समावेश होतो. भायखळा हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे यामिनी यशवंत जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ यामिनी यशवंत जाधव शिवसेना
२०१४ वारिस युसुफ पठाण ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
२००९ मधुकर बाळकृष्ण ऊर्फ अण्णा चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".