Jump to content

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ - ७१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार चंद्रपूर मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर तालुक्यातील घुगुस महसूल मंडळ आणि चंद्रपूर न.पा. या क्षेत्राचा समावेश होतो. चंद्रपूर हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[][]

भारतीय जनता पार्टीचे श्री. किशोर गजानन जोरगेवार हे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • चंद्रपूर तालुका : घुगुस महसूल मंडळ; चंद्रपूर महानगरपालिका

विधानसभा सदस्य

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२ लक्ष्मण कृष्णाजी वासेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७ लक्ष्मण कृष्णाजी वासेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ रामचंद्र राजेश्वर पोटदुखे अपक्ष
१९६७ ॲड. एकनाथ साळवे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ नरेशकुमार चुन्नीलाल पुगलिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८०
१९८५ श्याम गोपाळराव वानखेडे
१९९०
१९९५ सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार भारतीय जनता पक्ष
१९९९
२००४
२००९ नानाजी सिताराम शामकुळे
२०१४
२०१९ किशोर गजानन जोरगेवार अपक्ष
२०२४ भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्लिश भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  1. "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).