माण विधानसभा मतदारसंघ
माण विधानसभा मतदारसंघ [१]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
माण | ||
उमेदवार | पक्ष | मत |
जयकुमार भगवानराव गोरे | अपक्ष | ६०७०३ |
SADASHIV ABAJI POL | राष्ट्रवादी | ५६६०५ |
DR.YELGAONKAR DILIP MURLIDHAR | भाजप | ४१५८५ |
GUDAGE SURENDRA MOHANRAO | रासप | १८८७० |
SURESH DADU शिंदे | अपक्ष | २४६१ |
SANGITA PANDURANG SHELAR | अपक्ष | २०६६ |
SABLE KAUSHALYA BABASAHEB | बसपा | ११२३ |
GHUTUKADE DILIP SHRIPATI | अपक्ष | १०८२ |
DINESH GAJANAN KASHID | अपक्ष | ८८६ |
ADV.SACHIN DASHRATH SATPUTE | अपक्ष | ८११ |
ADV.VINOD DINKAR MORE | अपक्ष | ७५२ |
KARANDE CHANGDEO NAMDEO | अपक्ष | ५१६ |
KALE RAVSAHEB SITARAM | अपक्ष | ४३८ |
मान खटाव 2019 विधानसभा मतदार संघा मधील राजकीय परिस्थिती
ब्रेकिंग न्यूज.......ब्रेकिंग न्यूज........
वाचायची सुवर्णसंधी सोडू नका...... ठरलंय...बिघडलंय....परत रातीत ठरलंय....अन आता घबाड घेऊन परत बिघडवायच ठरलंय....
आमचं ठरलंयचा फिक्चर....
प्रमुख कलाकार - पब्या सायब ,ॲंडी भाऊ ,गिरणी भैय्या सह कलाकार - पैस बुडव्या डाक्टर व छावण्यांचा बादशहा (रोगार) निर्माता ,दिग्दर्शक - पब्या लिकर
आता बघा या ठरलयांवाल्यांच कसा पिक्चर हाय.....
प्रमुख कलाकारापैकी पब्या सायब आधी लढायलाच तयार नव्हता. नंतर वातावरण बघून तोही फाकड्या रिंणांगणात उतरण्यास तयार झाला.
नंतर आमचं ठरलंयाचा नवरदेव कोण यावरून वाद सुरू झाला.
शेवटी सर्वांना हाणूनमारून मुसलमान करत गप्प बसवत ॲंडी भाऊच्या गळ्यात कशीबशी उमेदवारीची माळ टाकण्यात आली. पण त्यावेेळीही इतर इच्छुकांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. ॲंडी भाऊची उमेदवारी फायनल करूनही ठरलंयवाल्यांनी आम्ही पण नवरदेव असा हट्ट धरला. शेवटी तू तू मै मै करत प्रमुख कलाकारांनी वेगवेगळा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेत एकत्रच येऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावेळी तिघांचे जमा झालेले कार्यकर्ते पाहून तिघांनाही बैलगाडीतून उतरू वाटेना. उमेदवारी कोणी माघारी घ्यायची हा मोठा घन प्रश्न. यात महत्त्वाची भूमिका बजावली ती फिक्चरचे निर्माते पब्या लिकर यानी आपण आमदार होऊ शकत नाही निदान आपला नावकरी तरी आमदार व्हावा.म्हणून त्यांनी इतरांचे अर्ज माघारी घेण्यासाठी खिंड लढवली.यात धपकाधपकी झाली.पाया पडापडी झाली.तरीही त्यांनी खिंड लढवली.त्या बिचाऱ्या गिरणी भैय्याला तर हाताला धरून फरफरट ओढत नेऊन अर्ज माघारी घ्यायला लावला.बिच्चार पडलेल्या तोंडान गप मागारी गेलं. त्या ॲंडी भाऊचं तर नशीबच फुटकं . सर्वांनी मिळून उमेदवारी फायनल करूनही पब्या सायबच्या हट्टापोटी अर्ज माघारी घ्यावा लागला. त्याचा उद्रेक म्हणून तिथ त्यांच्या पुतण्याने म्हणे पब्या सायबाच्या मेहुण्याच्याच कानशीलात लगावत हाणामारीही केली.नंतर ॲंडीच्या पुतण्याचा समाचार पोलीसांनी आत नेऊन कपडे फाडेपर्यंत चांगलाच केला म्हणे.मतदारापुढ हात जोडणारे हात पोलीसांपुढ झुकले. सर्व रणकंदन होऊन शेवटी अर्ज राहिला तो पब्या सायबाचा. दहशतमुक्त तालुके करायला निघालेल्या पब्या सायबानीच तहसिल कार्यालात दहशत करून इतरांना फॉर्म माघारी घ्यायला लावले. एवढा राडा झाल्यावर अनेकांना वाटल की आता ह्यांच्यात बिघाडलंय पण बिघडणारे ते ठरलंयवाले कसले.अनेक आणाभाका घेणारे एका रातीत कोटीच्या कोटी उड्डाने ठरवून पुन्हा आमचं ठरलंय म्हणायला मोकळे झाले. आता त्या एका रातीत नक्की काय ठरलंय काय माहित म्हणायला ही जनता एवढीही भोळीभाबडी राहीली नाही. मानअपमान ,हाणामारी हे सर्व विसरायला लक्ष्मीदर्शन पुरेसे ठरले. आपआपल्या रोलचे बजेट ठरले की सर्वांची बिनशर्त माघार घेत पुन्हा काम करण्यास तयार झाले. यातही पुन्हा महत्त्वाची जबाबदारी पेलली ती निर्माता पब्या लिकर याने.निर्माते पब्या लिकरने फिक्चर वठवला खरा मात्र त्यांच बजेट नक्की किती होत ते काही कळाल नाही.कारण त्यांच नेहमीच बिग बजेटच फिक्चर असतात. बर ते यातल दोन सहकलाकार राहिले त्यांना ना कुणाचे देणे ना घेणे तुमच कस करायच तस करा पण आमचं ध्यानात ठेवा म्हणत पैसबुडवा डाक्टर व छावण्यांचा बादशहा (रोगार) यांनी मात्र त्यांची भूमिका वठवली हे मात्र खरं. असा हा आमचं ठरलंयाचा फिक्चर पूर्ण तर झालाय पण तो चालणार की नाही हे जनतेच्या हातात आहे.बॉक्स ऑफिसवर पडतो तसा पडला तर वाईट वाटायला नको.बर त्यातील काही कलाकारांना परत फिक्चरमध्ये (पक्षात) घेतात की नाही त्याची मोठी काळजी.त्यातील ॲंडी भैय्या ,पैस बुडव्या डाक्टर व गिरणी भैय्या यांना तर हाकलून दिलय म्हणे.आता यांच काय व्हायचं...ना घर का ना घाट का.....आव त्या ॲंडीची दुकानदारी होणार बंद अन त्या गिरणी भैय्याची गिरणीच तर आता काय बोलूच नका....बर ते पैस बुडव काय सगळच बुडवून बसलय त्याला काय कुणाची गरज नाय प्रत्येक पाच वर्षाला मिळाल बस्स झालं. अहो पण रातीत जरा वेगळच झालय अस कळतय ...जे घबाड घेऊन ठरलंय म्हणतात त्यातले अनेकजण रातीत बदललेत अन म्हणतेत त्या पब्या सायबाला त्याची जागा दाखवायचीय.आम्ही हाय त्यांच्या बरबर तुम्हाला आतन काय सांगितलंय तेवढ बघा. असा हा ठरलंयवल्याचा फिक्चर बघा कसा हाय. आता या जनतेन अशा लबाडांना धडा शिकवून आपण सर्वसामान्य जनता काय आहे आहोत हे या निवडणूकीत नक्कीच दाखवून द्याव हे मात्र खरं.......
- एक माण खटाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरीक
संदर्भ[संपादन]
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसू्चना" (PDF). Archived from the original (PDF) on ३० जुलैै २०१४. १२ October २००९ रोजी पाहिले.
|विदा दिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे[संपादन]
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर माण विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |