Jump to content

कुलाबा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुलाबा विधानसभा मतदारसंघ - १८७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कुलाबा मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेतील जनगणना वॉर्ड क्र. १०१ - अप्पर कुलाबा, १०२ - मध्य आणि निम्नस्तर कुलाबा, १०३ - फोर्ट दक्षिण, १०४- फोर्ट उत्तर, १०५ - एस्प्लॅनेड, २०६ - मांडवी, २०७ - चकला, ३१३ - मार्केट, ३१४- धोबी तलाव आणि ३१५ - फणसवाडी यांचा समावेश होतो. कुलाबा हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे राहूल सुरेश नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ राहुल सुरेश नार्वेकर भारतीय जनता पक्ष
२०१४ राज के. पुरोहित भारतीय जनता पक्ष
२००९ अॅनी शेखर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".